परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला निपचीत पडलेलं पाहून आईचा आक्रोश अनावर

Jalgaon News : परीक्षेला जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने एकाला जीव गमवावा लागण्याची घटना जळगावात (Jalgaon Accident) घडलीय. आयशर ट्रकने तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेनंतर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचे शीर धडापासून वेगळे झाले. प्रशांत भागवत तायडे (Prashant Bhagwat Taide) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर हा दुर्दैवी अपघात झालाय.

परीक्षेला जात असतानाच अपघात

रावेर तालुक्यातील गहूखेडा गावातील प्रशांत आणि जयेश रहिवाशी आहेत. धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक महाविद्यालयात दोघेही मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून डिप्लोमाच्या परीक्षांच्या परीक्षा सुरु आहेत. शुक्रवारी प्रशांत आणि जयेश तिसरा पेपर देण्यासाठी सकाळी गहुखेडा गावातून दुचाकीवरुन निघाले होते. मात्र भरधाव आयशरने दुचाकीला मागून धडक दिल्याने गंभीर अपघात झाला.

हेही वाचा :  Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

हेल्मेट घातलेले शीर झाले धडावेगळे

या धडकेनंतर प्रशांत आणि जयेश दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. मात्र प्रशांत समोरुन येणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या खाली आला. यावेळी ट्रॅक्टरचे पुढचे चाक प्रशांतच्या डोक्यावरुन गेले. यात प्रशांतचे डोके हेल्मेटसह धडापासून वेगळे होऊन बाजूला पडले. तर जयेश गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जयेशला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कायमस्वरुपी नोकरी मिळवण्यासाठी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला आणि…

प्रशांत भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे महावितरण कंपनीत नोकरीला होता. कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून प्रशांतने उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने डिप्लोमाला प्रवेश घेतला होता. मात्र परीक्षेला जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रशांतच्या मागे त्याचे आई- वडील आणि एक विवाहित बहिण आहे. त्यामुळे तायडे कुटुंबाचा आधार हिरावल्याने प्रशांतच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

पतीला रुग्णालयात पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

दरम्यान, जळगावमध्ये आणखी एका भीषण अपघातात पतीला रुग्णालयात पाहायला जाणाऱ्या एका महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. कुसंबा येथे भरधाव रुग्णवाहिकेने महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आजारी असलेल्या पतीला पाहण्यासाठी ही महिला रुग्णालयात जात होती. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा :  'लुटेरी दुल्हन'; लग्नमंडपात तरुणीला वऱ्हाडींनी ओळखताच बिंग फुटलं, एका फोनमुळं धक्कादायक प्रकार समोर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …