China Atomic Weapons: बापरे, चीनकडे किती ही अण्वस्त्रे, बलाढ्य अमेरिकेचे उडालेत होश

US-China Conflict: चीनकडून भारतात घुसखोरी सुरुच आहे. चीनकडून कुरापती सुरुच आहेत. आता चीनबाबत ( China ) धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीन जमीन, समुद्र आणि हवाई अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे आणि त्याच्या अण्वस्त्रांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तसेच एकीकडे जगात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Ukraine Russia War) सुरु आहे आणि दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागॉन) चीनबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. पेंटागॉनने म्हटले आहे की, चीनकडे 2035 पर्यंत सुमारे 1,500 अण्वस्त्रे असण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार, त्यांच्याकडे 400 अणुसाठा आहे. 

चीनकडून लष्कराचे आधुनिकीकरण  

चीनच्या महत्त्वाकांक्षी लष्करी कार्यक्रमावर अमेरिकन संसदेत पेंटागॉनने दिलेल्या वार्षिक अहवालात पुढील दशकात आपल्या आण्विक शक्तींचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते म्हणाले की चीनचा सध्याचा आण्विक आधुनिकीकरण सराव पूर्वीच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अहवालात म्हटले आहे की, चीन जमीन, समुद्र आणि हवेतून हवेत अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे आणि अण्वस्त्रांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

आता चीनकडे 400 अण्वस्त्रे  

चीनच्या ऑपरेशनल आण्विक शस्त्रास्त्रांची संख्या 400 च्या वर गेली आहे, अशी माहिती पेंटागॉनने दिली आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) 2035 पर्यंत आपल्या राष्ट्रीय संरक्षण आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण पूर्ण करण्याची योजना आखली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘चीनने या गतीने अण्वस्त्रांचा विस्तार केला तर ते 2035 पर्यंत सुमारे 1,500 वॉरहेड्सचा साठा करु शकेल.’

हेही वाचा :  Video : 'तू भारतीय, मूर्ख आहेस...' चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी

दरम्यान, सध्या रशियाकडे सर्वाधिक शस्त्रे आहेत. त्याच्याकडे 5,977 अण्वस्त्रे आहेत तर अमेरिकेकडे 5428 आहेत. भारताकडे फक्त 159 अण्वस्त्रे आहेत. पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे की चीनने 2021 मध्ये 135 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. गेल्यावर्षी जगात घेण्यात आलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. चीनचा हेतूविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीनकडून अमेरिकेला आव्हान देण्याची ताकद आहे आणि याचे एक कारण त्यांच्याकडे असेलेले तंत्रज्ञान आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …