96.8Kg वजनामुळे दिसू लागली होती हाय बीपी-फॅटी लिव्हरची लक्षणे, ग्रीन टी पिऊन 5 महिन्यात कमी केलं 18Kg वजन

नितेश भारद्वाज 37 वर्षांचे असून अजमेरला राहतात. जंक फूड आणि आरामासारखं आयुष्य जगताना ते कधी लठ्ठपणाचा बळी ठरले, हे त्यांचच त्यांना कळलं नाही. चुकीची जीवनशैलीमुळे त्यांचे वजन 96.8 किलोपर्यंत पोहोचले होते. नितेश सांगतात की, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असल्याने मला शरीरातील विकृतीची लक्षणे समजू लागली. डॉक्टरांनी तपासणी केली असता, चरबीमुळे माझा रक्तदाब वाढला आहे, तसेच माझ्या यकृतामध्ये चरबी जमा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर मी ताबडतोब माझी दिनचर्या सुधारली आणि सुमारे 5 महिन्यांत 18 किलो वजन कमी केले. वजन कमी करण्यासोबतच नितेशचा फॅट टू फिट ट्रान्सफॉर्मेशन अधिक महत्वाचं आहे.

नाव- नितेश भारद्वाज
व्यवसाय- हेल्थकेअर मार्केटिंग
वय- 37
शहर– अजमेर
सर्वाधिक नोंदवलेले वजन – 96.8 किलो
कमी केलेले वजन – 18 किलो
वजन कमी करण्यासाठी लागणारा वेळ – सुमारे 5 महिने (फोटो सौजन्य – NBT / iStock)

टर्निंग पॉईंट

टर्निंग पॉईंट

नितेश सांगतात की, लठ्ठपणामुळे शरीरात हाय बीपीसारखे जीवघेणे आजार बळावू लागले होते. आरोग्य चाचणी केल्यानंतर, मला कळले की माझ्या यकृतातील एन्झाईम्स असामान्य आहे. त्यानंतर माझ्या डॉक्टरांनी सल्ला दिला की यामुळे दीर्घकाळ फॅटी लिव्हर देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत वजन कमी करणे हाच उपाय आहे. तेव्हाच मी माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.
(वाचा – Diabetes Urine Symptoms : लघवीमधील या ५ लक्षणांनी ओळखा डायबिटिस तुम्हाला झाला की नाही, लगेच करा हे काम)​

हेही वाचा :  Baba Vanga : बाबा वेंगा यांची पुढील वर्षाची भविष्यवाणी, 2023 साठी धोकादायक इशारा

डाएट

डाएट

1. नाश्ता
बार्ली / 2 मल्टी ग्रेन रोटी आणि भाजी

2. प्री-लंच ड्रिंक
नारळ पाणी

3. दुपारचे जेवण
बार्ली दलिया/स्प्राउट्स/स्वीट कॉर्न

4. संध्याकाळचा नाश्ता
सलाड आणि फळे

5. रात्रीचे जेवण
ओट्स/खिचडी

6. रात्रीच्या जेवणानंतरचे पेय
ग्रीन टी

7. पोस्ट वर्कआउट पेय
हिरवा चहा

फिटनेस सिक्रेट

फिटनेस सिक्रेट

नितेश स्पष्ट करतात की, फिटनेस सिक्रेटमागील गणित अगदी सोपे आहे. निरोगी शरीरासाठी तुम्हाला नियमितपणे स्वतःवर काम करायचे आहे. हा प्रवास हळूहळू पूर्ण करायचा आहे. मी दररोज स्वतःचे वजन तपासायचो. कारण 100 ग्रॅम वजन कमी होणे किंवा वाढणे ही काही छोटी गोष्ट नाही

स्वतःला कसं ठेवलं मोटिव्हेट?
वजन कमी करताना स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी मला वाटायचे की, मी आता थांबलो तर माझी सगळी मेहनत वाया जाईल.


लक्ष कसे टिकवायचे? मी माझी प्रगती नियमितपणे मोजत असे. यासाठी मी रोज सकाळी रिकाम्या पोटी, कसरत केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे वजन केले.

​(वाचा – Diabetes Treatment : डायबिटिजवर जालीम उपाय आहे हे भारतीय फूल, पटापट कमी करेल Blood Sugar)​

वर्कआऊट

वर्कआऊट

नितेश सांगतो की, वजन कमी करण्यासाठी मी आठवड्यातून 5 दिवस वर्कआउट करतो. मी 3500 पायऱ्या चालण्यापासून सुरुवात केली. जी आता मी 3.75 किमी जॉगिंगपर्यंत वाढवली आहे. तसेच मी दररोज 2.54 किमी चालणे अधिक सायकलिंग आणि 10 मिनिटे स्क्वॅट करतो.

हेही वाचा :  सारा अली खानची आश्चर्यचकित करणारी वेट लॉस जर्नी, ४० किलो वजन घटवत केले सर्वांना अवाक्

​(वाचा – सकाळी टॉयलेटमधूनच निघून जाईल LDL Cholesterol, फक्त या पदार्थाचं न चुकता करा सेवन)​

कोणत्या समस्या जाणवल्या?

कोणत्या समस्या जाणवल्या?

लठ्ठपणाचे दिवस आठवून नितेश सांगतात की, जास्त वजनामुळे माझी तब्येत खराब होऊ लागली. शरीरातील चरबी वाढल्यामुळे, यकृतातील एन्झाईम्समध्ये गडबड झाल्यामुळे मी उच्च रक्तदाब आणि मध्यम फॅटी लिव्हर यांसारख्या घातक आजारांचा रुग्ण झालो होतो.

​(वाचा – Herbs for Uric Acid: शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाल्यास दिसतात ही लक्षणे, हर्ब्सच्या माध्यमातून करा बचाव)​

या प्रवासातून काय शिकलात?

या प्रवासातून काय शिकलात?

माझे निरोगी वजन परत आल्यानंतर जेव्हा मी माझ्या संपूर्ण वजन कमी करण्याच्या प्रवासाकडे वळून पाहतो, तेव्हा मला जाणवते की लहान प्रयत्नांमुळे मोठे परिणाम होतात.

10 वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कोणत्या आकारात पाहता? मला आजपासून दहा वर्षांनी स्वत:ला तंदुरुस्त पाहायचे आहे. यासाठी मी सध्या वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत आहे.

(वाचा – Low Sodium Foods: सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …