Baba Vanga : बाबा वेंगा यांची पुढील वर्षाची भविष्यवाणी, 2023 साठी धोकादायक इशारा

Baba Venga Prediction: बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. 2022 वर्ष संपायला एका आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि लोकांनी 2023 च्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. यासोबतच बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी खरी ठरली तर पृथ्वीवर कहर होईल. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.

2023 मध्ये तिसरे महायुद्ध होण्याचा धोका

बाबा वेंगा याच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होऊ शकते आणि यादरम्यान अणुहल्ला होऊ शकतो. यामुळे पृथ्वीवर मोठा उद्रेक होऊ शकतो. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीला रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाशी जोडून तज्ज्ञ पाहत आहेत आणि असे मानले जात आहे की ते पुढील वर्षी तिसऱ्या महायुद्धाचे रुप धारण करु शकते.

हेही वाचा :  PM नरेंद्र मोदी भेटीनंतर एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले "मी मोदींचा चाहता, लवकरच भारतात Tesla...."

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलू शकते

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक मोठे बदल होऊ शकतात. या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे बाबा वेंगा यांनी सांगितले होते.

2023 मध्ये जैविक हल्ल्याचा मोठा धोका

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जैविक शस्त्रांच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा हल्ला कोण करणार आणि कोणावर हा हल्ला करण्यात येणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. यासोबतच बाबा वेंगा यांनी सौर वादळांबाबत म्हणजेच सौरमालेतील वादळांचीही भविष्यवाणी केली होती.

-2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

– 2023 मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

– 2023 पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.

हेही वाचा :  7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

– 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.  

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …