Pune : फॉरेनर तरुणीचा डान्स पाहून पुणेकर खूश! रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसब्यामध्ये काँग्रेसचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. 28 वर्षानंतर भाजपचा मतदारसंघातत पराभव झाला आहे (Pune Kasaba Bypoll Election Result ). यामुळे या विजयाच्या महाविकास आगाडीत वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे. धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले आहेत. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धंगेकर यांच्या विजयासह या तरुणीच्या डान्सची देखील जोरदार चर्चा पुण्यात रंगली आहे. 

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना….. असं म्हणतात…. असंच एक दृश्य आज कसब्यात पाहायला मिळालं. रवींद्र धंगेकरांच्या विजयी रॅलीमध्ये एका परदेशी महिलेनं बेधुंद होऊन डान्स केला. ही महिला कोण, कुठल्या देशातून आली होती. याबद्दल काहीच माहिती समोर आलेली  नाही. पण, गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या तालावर विजयी मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये ही महिला सहभागी झाली आणि तिनं मनसोक्त डान्स केला. 

 

हेही वाचा :  Maharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा

कसबा पोटनिवडणुकीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दत्तवाडी म्हसोबा चौकात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांवर जेसीबीतून फुलं आणि गुलालाची उधळण केली. नाशिमध्ये मविआतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.. फटाक्यांची आतशबाजी करत, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

या  विजयाचा सोलापुरात जल्लोष करण्यात आला. टिळक चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून आनंदोत्सव केला. यावेळी, एकमेकांना पेढे वाटत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

धुळ्यातही  काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. रवींद्र धंगेकरांच्या  विजयानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

हेमंत रासनेंचा 10 हजार 950 मतांनी पराभव

सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे भाजपचा बालेकिल्ला उद्वस्त झालाय. रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा 10 हजार 950 मतांनी पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 193 मतं मिळाली तर भाजपच्या हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. भाजपचं वर्चस्व असलेल्या कसब्याच्या गडाला 28 वर्षांनी काँग्रेसनं सुरुंग लावला. उमेदवार म्हणून मी कमी पडलो, असं म्हणत रासने यांनी पराभव मान्य केलाय.  

हेही वाचा :  Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी...हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

कसब्यातील निकालानं भाजपची मस्ती उतरवली; नाना पटोलेंची विकारी टीका

कसब्यातील निकालानं भाजपची मस्ती उतरवली असा विखारी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय. निवडणुकीत भाजपने पैसे वाटले, गुडांना सोबत घेतेलं मात्र तरीही जनतेनं त्यांना धडा शिकवला. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालीय असंही नाना पटोलेनी म्हंटलंय. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसब्यातील पराभव मान्य केलाय. पराभवाचं आत्मचिंतन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, ‘मिस्टर राजू तुम्ही…’

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind …