…तसं सर मला पायदळी तुडवतात; प्रजासत्ताक दिनावर चिमुकल्याचे भाषण ऐकून पोट धरुन हसाल

Republic Day 2023 : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत (Delhi) कर्तव्यापथावर पथसंचलन करण्यात आले. तर देशभरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. अनेक सरकारी कार्यालये, महाविद्यालये, शाळांमध्येही उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याता आलाय. यावेळी शाळांमध्ये मुलांनी विविध विषयांवर भाषणेसुद्धा केली. महाराष्ट्राती (Republic Day Maharashtra) अशाच एका शाळकरी विद्यार्थ्याने संविधानाचे महत्त्व सांगणारे केलेले भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका गावात ध्वज फडकवण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी एका विद्यार्थ्याने केलेल्या भाषणाने शिक्षकांसह सर्वांनाच हसू अनावर झाले. या विद्यार्थ्याने भाषण करताना लोकशाहीचा आपल्याला कसा फायदा झालाय हे सांगितलं. भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्याचे जोरदार कौतुक केले. 

काय म्हटलंय या चिमुकल्याने आपल्या भाषणात?

“खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसे सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही,” असे या चिमुकल्याने आपल्या भाषणात म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कोणत्या शाळेतील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

हेही वाचा :  Delhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …