नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला पाकिस्तानी अभिनेत्री आयशानं दिलं उत्तर

Ayesha Omar On Shoaib Malik: क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांचा घटस्फोट होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबत (Ayesha Omar) शोएबचं नाव जोडलं जाऊ लागलं. नुकताच एका नेटकऱ्यानं आयशा आणि शोएबच्या नात्याबाबत आयशाला प्रश्न विचारला. या प्रश्नाला आयशानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेटकऱ्याच्या प्रश्नाला आयशानं दिलं उत्तर

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटचा आणि आयशानं त्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रिनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉर्टमध्ये दिसत आहे की, एका नेटकऱ्यानं आयशाला प्रश्न विचारला, ‘तुम्ही दोघे लग्न करणार आहात का?’ या प्रश्नाला आयशानं उत्तर दिलं, ‘नाही. अजिबात नाही. त्यांचं लग्न झालेलं आहे. शोएब त्यांच्या पत्नीसोबत आनंदानं राहात आहेत. मी शोएब आणि सानियाचा आदर करते. मी आणि शोएब केवळ चांगले मित्र आहोत.’

News Reels

नोव्हेंबर 2021 मध्ये आयशा आणि शोएब यांनी एक फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्यांनी एका मासिकासाठी केले होते. आता शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानच आयशासोबतचे शोएबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे आयशाचं नाव शोएबसोबत जोडलं जाऊ लागलं. 


शोएब आणि सानिया यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे.

हेही वाचा :  मूड बना लिया... Amruta Fadnavis थिकरल्या; चाहत्यांना आवाहन करत म्हणाल्या...

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sania Mirza,Shoaib Malik:  पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झाचा घटस्फोट? शोएब मलिकसोबतचे फोटो व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …