प्रेगन्सीनंतर चारू असोपाचे ट्रान्सफॉर्मेशन कसे करतेय वजन कमी, पुन्हा दिसली राजीव सेनसह

गरोदरपणानंतर वजन भरपूर वाढते. पण कमी कसे करायचे असा अनेकांना प्रश्न असतो. आलिया भटने नुकतेच आपल्या गरोदरपणानंतर पुन्हा जिमला जाणे सुरू केले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त अभिनेत्री चारू असोपा हिनेही आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत आणि स्वतःच्या शरीरात बदल घडवून आणला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चारू असोपा आणि राजीव सेन यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. मात्र हे कधी एक होतात तर कधी एकमेकांवर आरोप करतात. त्यामुळे यांच्या दरम्यान नक्की सुरू काय आहे असा प्रश्नही चाहत्यांना आहे. मात्र या सगळ्यातून चारूने मात्र आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला सुरूवात केली असून आता पुन्हा एकदा जिमला सुरूवात केली आहे. कसे करतेय चारू ट्रान्सफॉर्मेशन जाणून घेऊया.

चारू असोपाकडून घ्या वजन कमी करण्यासाठी प्रेरणा

जिममध्ये मेहनत

चारू सध्या जिममध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसून येत आहे. प्रेगन्सीनंतर अनेक महिलांना वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पण बाळाला सांभाळताना स्वतःची काळजी मात्र बाजूला राहते आणि मग ठराविक कालावधीनंतर अनेक दुखणी समोर येतात. पण आपल्या जिम ट्रेनरच्या सहाय्याने तुम्ही वजन कमी करू शकता. सी सेक्शनद्वारे बाळ झाले असल्यास, डॉक्टरांशी सल्लामसलत करून तुम्ही व्यायामाला सुरूवात करावी. चारूदेखील सध्या त्याचप्रमाणे ट्रेनिंग घेत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम तिच्या फोटोंवरून कळत आहे. चारूचे हे ट्रान्सफॉर्मेशन वाखाणण्याजोगे आहे.

हेही वाचा :  पुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला

स्ट्रेचिंग

बाळंतपणानंतर पोट खूपच वाढते आणि त्यासाठी व्यायमाची गरज भासते.यासाठी लेग स्ट्रेचिंग आणि इतर फ्लोअर व्यायाम उपयोगी ठरतो. पोट कमी करण्यासाठी जिम ट्रेनरच्या उपस्थितीत चारू सध्या स्ट्रेचिंग करत आहे. ज्यामुळे तिच्या संपूर्ण शरीराचे निगा कारण्यासाठी आणि शरीरातील सर्व फॅट्स कमी होण्यास मदत मिळत आहे. तुम्हालाही पोटावरील चरबी प्रेगन्सीनंतर कमी करायची असेल तर तुम्ही जिम ट्रेनरच्या मदतीने हा व्यायाम करू शकता.

(वाचा – Weight Loss करण्यासाठी डाएटिंग करायचा कंटाळा येत असेल तर वापरा या सोप्या टिप्स)

अप्पर बॉडी वर्कआऊट

अप्पर बॉडी वर्कआऊटमध्ये अनेक प्रकार येतात. यामध्ये रोप एक्सरसाईज आणि अन्य व्यायाम करू शकता. मात्र हे करताना तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. चारूने आपल्या शरीरात बदल करण्यासाठी केलेली मेहनत आता तिचा हा फोटो पाहताना नक्कीच जाणवत आहे.

(वाचा – मलायकाच्या मॉर्निंग रूटीनमध्ये आहे या खास ड्रिंकचा समावेश, परफेक्ट फिगरसाठी रोज प्यावे)

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी अन्य उपाय

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी अन्य उपायही तुम्ही व्यायामासह करू शकता. ज्याच्या काही टिप्स तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

  • हेल्दी खाण्याला द्या प्राधान्य – महिलांना बाळंतपणानंतर अधिक भूक लागते. पण ती भूक शमविण्यासाठी केवळ हेल्दी खाण्याला प्राधान्य द्या. क्रॅश डाएटचा आधार घेऊ नका. इंटरमिटेंट फास्टिंग न करता, फळं, भाजी यावर लक्ष द्या
  • ब्रेस्टफीड करावे – ऑफिसमध्ये अनेक महिला जातात. मात्र आपल्या बाळाला स्तनपान करणे सोडू नका. ब्रेस्टफीड न केल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे आपल्या मुलांना स्तनपान नक्की करू द्या
  • दिवसभर अॅक्टिव्ह राहा – वेट लॉस करण्यासाठी गरोदरपणानंतर लाइफस्टाइलमध्ये बदल करा. दिवसभर अॅक्टिव्ह राहा. प्रत्येक जेवणानंतर किमान १० – १५ मिनिट्स चाला
  • कॅलरीवर लक्ष ठेवा – प्रेगन्सीनंतर तुम्ही दिवसभर काय खाता आणि त्यातून व्यवस्थित कॅलरी मिळते की नाही याकडे लक्ष द्या. १५०० कॅलरी पोटात जायला हवी. यापेक्षा जास्त कॅलरी खाऊ नका. वजन कमी करायचे असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या
हेही वाचा :  How To Lose Weight: ३०० किलो वजनाच्या माणसाने केले १६५ किलो वजन कमी

तुम्हालाही तुमच्या शरीरात गरोदरपणानंतर बदल हवे असतील आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नक्कीच या टिप्सचा उपयोग करून घ्या. तसंच व्यायाम करताना तुमच्या डॉक्टरांचा आणि जिम ट्रेनरचा सल्ला घ्यायला विसरू नका.

(फोटो क्रेडिटः Charu Asopa Instagram, Rajeev Sen Instagram)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …