Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त, ‘हे’ आहे घटस्फोटाचं कारण

Sania Mirza Shoaib Malik Divorce : भारतीय टेनिसपटू ( Indian Tennis Player ) सानिया मिर्झा ( Sania Mirza ) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू ( Pakistan Cricketer ) शोएब मलिक (Sania Mirza Shoaib Malik Divorce) यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यातमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ( Shoaib Malik ) यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्याबाबत चर्चावर शिक्कामोर्तब करत ते दोघेही विभक्त झाल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.

दोघेही बऱ्याच काळापासून राहतायत वेगळे

शोएब मलिकच्या जवळच्या सहाय्यकाने याबाबत सांगितलं आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे. 


सानिया मिर्झाने शेअर केली होती भावूक पोस्ट

हेही वाचा :  रोहित शर्मा अनफिट, केएल राहुल नाही तर 'या' खेळाडूला मिळू शकतं श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपद

काही दिवसांपूवी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. सानियाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. याशिवाय सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला इजहानचा फोटो शेअर केला होता. पण शोएबचा नाही. तेव्हाचा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं स्पष्ट झालं होतं.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा

सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. सनिया सध्या 35 वर्षांची आहे, तर शोएब मलिक 40 वर्षांचा आहे. 

शोएब आणि सानियाच्या आयुष्यात काहीही सुरळीत हा अंदाज आथआ खरा ठरला आहे. सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे की दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिया सध्या दुबईमध्ये आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …