IND vs SL, T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी समोर येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित या मालिकेसाठी अनफिट आहे, अशा परिस्थितीत केएल राहुल नाही तर हार्दिक पांड्याकडे टीमची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुल या संघातही नसल्याचं समोर येत आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, "श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित शर्माची बोटाची दुखापत बरी होईल असे सध्या तरी दिसत नाही." अशा परिस्थितीत हार्दिक संघाचे नेतृत्व करेल. केएल राहुलचा विचार केला तर टी20 संघात तो अधिक काळ नसेल असेच दिसून येत आहे.लवकरच बीसीसआय श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या फॉर्मेटसाठी टीम इंडियाची निवड करेल, असंही यावेळी या सूत्राने सांगितलं.

हे देखील वाचा-

Watch Video: भरमैदानात विराट बांगलादेशी खेळाडूवर भडकला; वाद मिटवण्यासाठी शाकीब आला धावून, नेमकं काय घडलं?

Check Also
विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’
Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …
IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?
IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …