मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली ‘ती’ पोस्ट? आता Screenshots व्हायरल

Did PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज भोपाळ रेल्वे स्थानकामधून एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवला. पहिल्यांदाच भारतामध्ये एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट त्यांनी सोशल मीडियावरुन डिलीट केल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. विशेष म्हणजे हे कथित ट्वीट डिलीट करण्यामागे कारण ठरले आहेत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj)!

प्रकाश राज यांनी काय ट्वीट केलंय?

प्रकाश राज यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका ट्वीटमध्ये आपण रिप्लाय केलेलं ट्वीट कोणी डिलीट केलं असा प्रश्न विचारला आहे. सध्या प्रकाश राज यांचं हे ट्वीट व्हायरल होतं आहे. केल्या जात असलेल्या दाव्यांनुसार प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींच्या एका ट्वीटला रिप्लाय दिला होता. “मी भारताचा एक नागरिक आहे. मी प्रश्न विचारु शकतो. मात्र माझं ट्वीट कोण डिलीट करु शकतं? केवळ विचारतोय मी,” अशा कॅप्शनसहीत प्रकाश राज यांनी स्वत:चं ट्वीट आणि डिलीट करण्यात आलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.

कोणत्या ट्वीटवरुन गोंधळ?

“हे स्टेशन मास्तर करु शकतो. तुम्हाला मणीपूरमध्ये पाहायला आम्हाला आवडेल सरजी,” असा रिप्लाय प्रकाश राज यांनी एका ट्वीटला दिला असून ते मूळ ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं प्रकाश राज यांच्या ट्वीटर टाइमलाइनवर दिसत आहे. या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी मणिपूर जळतंय अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे. हा रिप्लाय प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींच्या एका ट्वीटला दिला होता. पण आता मोदींचं ते ट्वीट दिसत नसून हे कोणी डिलीट केलं याबद्दल प्रकाश राजच विचारणा करत आहेत. 

हेही वाचा :  Maharashtra Politics : शिवसेना फुटली, घरंही फुटली; शिंदे-ठाकरे वादात 'ही' कुटुंब दुभंगली

काय होतं मोदींच्या ट्वीटमध्ये?

प्रकाश राज यांनी ट्वीट कोणी डिलीट केलंय असा प्रश्न स्क्रीनशॉट पोस्ट करुन विचारलेला असतानाच काही जणांनी प्रकाश राज यांनी नेमक्या कोणत्या ट्वीटवर रिप्लाय केलेला याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये मूळ ट्वीट मोदींचं होतं ज्यावर प्रकाश राज यांनी टोला लगावलेला. व्हायरल स्क्रीनशॉटनुसार पंतप्रधान मोदींनी 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये मोदींनी, “मी उद्या 27 जून रोजी 2 कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये असेन. पहिला कार्यक्रम 5 वंदे भारत ट्रेनला झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी राणी कमलापट्टी रेल्वे स्थानकावर आहे. या ट्रेन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, बिहार आणि झारखंडमधील कनेक्टीव्हीटी वाढवतील,” असं म्हटलं होतं.

याच ट्वीटरवरुन मोदींनी मी ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी भोपाळमध्ये असेल असं म्हटलं होतं त्यावर प्रकाश राज यांनी रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी स्टेशन मास्तर आहेत. तुम्हाला मणिपूरमध्ये पाहायला आवडेल असा टोला लगावला होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …