Main Atal Hoon : ‘मैं अटल हूँ’ सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट

Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून ‘मैं अटल हूँ’ (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात ते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकजचा फर्स्ट लूक आज आऊट झाला आहे. राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या फोटोंच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या आहेत. या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याचा अंदाज लूकवरुन येत आहे. 

पंकज त्रिपाठी यांनी पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत लिहिलं आहे,”अटलजींचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पड्यावर साकारण्याची संधी मला मिळाली आहे. मी आभारी आहे”. दोन दिवसांपूर्वी या सिनेमासंदर्भात एक पोस्ट त्यांनी शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं,”खूप उत्साह, थोडी भीती, वेगवेगळे विचार पण निष्ठा, अटलजींच्या भूमिकेसाठी हे समर्पित, आता मी अटल आहे. अटलजींचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर साकारणं ही खरोखर एक परिक्षाच आहे. या परीक्षेत त्यांचा आर्शीवाद आमच्यासोबत आहे”. 


‘मैं अटल हूँ’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव सांभाळत आहेत. त्यांनीदेखील सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी यांची पहिली झलक शेअर केली आहे. ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा :  बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला खिलाडी कुमारचा 'सेल्फी'

पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत नाविण्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता अटलजींच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Atal : अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी; दिग्दर्शकाच्या भूमिकेत मराठमोळा चेहरा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …