बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने शेअर केली ‘Citadel’ची पहिली झलक

Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सीरिजमध्ये देसी गर्ल एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 28 एप्रिलला या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे. 

प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक 

प्रियांकाने ‘सिटाडेल’चा फर्स्ट लुक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फर्स्ट लुक शेअर करत तिने लिहिलं आहे,”सिटाडेल’ ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर पाहता येईल”. ‘सिटाडेल’मधील प्रियांकाचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिलं आहे,’कमाल’, ‘नेहमीप्रमाणे धमाका करण्यास प्रियांका सज्ज आहे’, ‘प्रियांकाला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे”. 


गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार प्रियांका चोप्रा

‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असं तिच्या पात्राचं नाव आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियांका एकीकडे अॅक्शन मोडमध्ये दिसणार असून दुसरीकडे रोमॅंटिक अंदाजात चाहत्यांना घायाळ करतानादेखील दिसणार आहे. ‘सिटाडेल’च्या फर्स्ट लुकमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. 

हेही वाचा :  Sonalee Kulkarni : 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ने दिली शिवरायांना मानवंदना

सायन्स फिक्शन ड्रामा असलेली ‘सिटाडेल’

‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना सायन्स फिक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियांका चोप्रासह रिचर्ड मैडन, लेस्ली मैनविल आणि स्टेनली टुकी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिचर्ड मैडन केनच्या भूमिकेत आहे. तर स्टैनली टूचीदेखील एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. सहा भागांच्या या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिटाडेल’ या वेबसीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. 

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Movie)

प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर ती ‘लव्ह अगेन’ या रोमॅंटिक, विनोदी सिनेमात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत झळकणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलियाभट्टसोबत दिसणार आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनेकदा ती लाडकी लेक मालतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

संबंधित बातम्या

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली ‘सिटाडेल’ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …