Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक!

Priyanka Chopra : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांकाने तिची लेक ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

प्रियांकाने लेकीचा एक फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत लाडक्या लेकीचा अर्धाच चेहरा दिसत आहे. उबदार टोपीने तिचा चेहरा झाकलेला आहे. तसेच पांढऱ्या रंगाचं एक गोड स्वेटर बाळाने घातलं आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत तिची लाडकी लेक झोपलेली दिसत आहे. 

निक जोनससोबत प्रियांका 1 डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकली. राजस्थानात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. तर 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निक आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. 

News Reels

लेकीचा फोटो शेअर करत प्रियांकान ‘आय मीन’ म्हणजेच ‘मला म्हणायचयं’ असं कॅप्शन लिहिलं आहे. प्रियांकाच्या लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘गोंडस’, ‘गोड बाळ’, ‘मालतीचे ओठ निकसारखे आहेत’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. 


प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट 

प्रियांका चोप्राचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच ती ‘लव अगेन’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात सॅम ह्यूगन आणि सेलीन डायोन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच ‘सिटाडेल’ या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेबसीरिजमध्येदेखील ती दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या आगामी सिनेमात ती बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. 

हेही वाचा :  'आपला सिद्धू' झळकणार 'Three Cheers' सिनेमात

प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

संबंधित बातम्या

World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, ‘वजन कमी होणे, चिडचिड अन्… ‘



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …