तिसऱ्या प्रयत्नात अंकिता शर्मांनी केली युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण; IPS पदापर्यंत घेतली गगनभरारी!

UPSC Success Story स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी की IAS, IPS, IFS तर काहीजण इतर परीक्षा उत्तीर्ण होतात. या संपूर्ण प्रवासात जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. यात आपला कोणी ना कोणी आदर्श असतोच. अशाच IPS अंकिता शर्मा, यांच्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी आहेत.‌

त्यांच्या प्रवासातून यांना देखील प्रेरणा मिळाली आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले.IPS अंकिता शर्मा या छत्तीसगड केडरच्या २०१८ बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या सध्या खैरागड-चुईखदान-गंडई जिल्ह्याच्या एसपी म्हणून तैनात आहेत. अंकिताने यापूर्वी बस्तरमध्ये अनेक नक्षलवादी कारवायांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी २०१८ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली. तिने ऑल इंडिया रँक (AIR) २२३ मिळवले आणि अंतिम यादीत १०३५ गुण मिळवले.

IPS अंकिता मूळची दुर्ग, छत्तीसगडची आहे आपल्या गावी पदवी घेतल्यानंतर तिने एमबीए पूर्ण केले.त्यांचे वडील व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.
अंकिता शर्माने तिचे सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेली. पण ती फक्त सहा महिने तिथे राहून घरी परतली.

हेही वाचा :  PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 64 जागांसाठी भरती

त्यानंतर तिने स्वतः परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नानंतर अपयश आल्यावर आता पुढे काय? हा प्रश्न तिच्या सोबत होता. पण अपयशावर मात करत उत्तर शोधत तिने तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती आयपीएस झाली भारतीय लष्करातील अधिकारी विवेकानंद शुक्ला यांच्याशी तिचा विवाह झाला आहे. मित्रांनो, स्वप्न पूर्ण होतात फक्त आपली जिद्द असली पाहिजे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …