Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार


युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकजण धडपडत असतानाच येथील एका भारतीयाने मात्र एक अजब तर्क देत भारतात न परतण्याचा निर्णय घेतलाय. या भारतीयाने पाळलेला एक बिबट्या आणि ब्लॅक पँथर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सोडून भारतात परतण्यास नकार दिलाय. तो सध्या डोनबास शहरामधील त्याच्या घराखालील बंकरमध्ये या पाळीव प्राण्यांसाहीत जीव मुठीत घेऊन राहतोय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स […]

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामधून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अनेकजण धडपडत असतानाच येथील एका भारतीयाने मात्र एक अजब तर्क देत भारतात न परतण्याचा निर्णय घेतलाय. या भारतीयाने पाळलेला एक बिबट्या आणि ब्लॅक पँथर युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सोडून भारतात परतण्यास नकार दिलाय. तो सध्या डोनबास शहरामधील त्याच्या घराखालील बंकरमध्ये या पाळीव प्राण्यांसाहीत जीव मुठीत घेऊन राहतोय. (युद्धाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

आपण आपल्या लाडक्या प्राण्यांना सोडून जाणार नाही असा हट्ट त्याने केलाय. याच हट्टामुळे सतत बॉम्बवर्षाव होणाऱ्या शहरामध्ये तो बंकरमध्ये राहतोय. डोनबास हे अग्नेय युक्रेनमधील ऐतिहासिक, संस्कृतिक आणि आर्थिक राजधानीचं शहर आहे. सध्या या शहरामधील मोठ्या भागावर बंडखोरांनी ताबा मिळवला असून शहरावर ताबा मिळवण्यासाठी येथे संघर्ष सुरु आहे. युक्रेनची राजधानी असणाऱ्या किव्हपासून डोनबास हे ८५० किलोमीटरवर आहे.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

आपल्या पाळीव बिबट्या आणि ब्लॅक पँथरशिवाय न परतण्याचा हट्ट करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे कुमार बांडी. कुमार हा आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील टानकू येथील रहिवाशी आहे. कुमार हा १५ वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो तिथेच डॉक्टर म्हणून स्थायिक झालाय. तो एक तेलगू युट्यूब व्लॉगर म्हणूनही लोकप्रिय आहे.

हेही वाचा :  'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

कुमारला चित्रपटांचीही आवड आहे. तो भारतात असताना त्याने चार चित्रपटांमध्ये छोटी भूमिका केली होती. मात्र हे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. याचप्रमाणे त्याने तेलगु, तमिळ आणि मल्याळम भाषांमधील मालिकांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केल्यात.

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

कुमारचा भाऊ राम हा युक्रेनमध्ये आधी शिक्षणासाठी गेले होता. त्याच्या मदतीनेच कुमारही युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला आणि शिक्षण पूर्ण करुन तिथेच डॉक्टर म्हणून स्थायिक झाला. त्याने चित्रपटांच्या आवडीपोटी युक्रेनमधील काही चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्यात.

कुमारला पाळीव प्राण्याची फार आवड आहे. लहानपणापासूनच त्याने घरी कुत्रा, मांजरी आणि पक्षांसारखे पाळीव प्राणी पाळलेले. एका तेलगू चित्रपटामध्ये एका व्हिलनकडे पाळीव बिबट्या असल्याचं पाहिल्यानंतर आपल्याकडे अशाप्रकारे पाळीव बिबट्या असावा असं कुमारला वाटू लागलं. तेव्हापासून त्याने बिबट्या कसा पाळता येईल याबद्दल शोध घेण्यास सुरुवात केली.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

कुमार शिक्षणासाठी युक्रेनला गेल्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यावर तो डॉक्टर म्हणून काम करु लागला. आर्थिक दृष्ट्या थोडा स्थीर झाल्यानंतर त्याने बंगला टायगर पाळण्याचा विचार केला होता. मात्र त्याला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली. या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचा आर्थिक खर्च कुमारला परवडणार नाही असं सांगून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्याने युक्रेनमध्ये आढळणारे बिबट्या आणि ब्लॅक पँथर पाळण्यासाठी अर्ज केला आणि त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळवली.

हेही वाचा :  मुंबईत घरविक्री कमी, तरीही महसुलात वाढ

आपल्याकडे असणारा बिबट्या हा फार दुर्मिळ प्रजातीमधील असून असे केवळ २१ प्राणी जगभरामध्ये असल्याचा दावा कुमारने केलाय. हा दुर्मिळ असण्यामागील कारण म्हणजे त्याचा जन्म बिबट्या आणि जॅग्वारच्या क्रॉसब्रीडींगमधून झालेला आहे असा कुमारचा दावा आहे. कुमारने त्याला याग्वार असं नाव दिलंय. कुमारकडे हा याग्वार मागील १९ महिन्यांपासून आहे. या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा कुमारचा मानस आहे. या प्राण्यांची संख्या वाढवता यावी म्हणून कुमारने काही महिन्यांपूर्वी एक ब्लॅक पँथरही विकत घेतलाय.

कुमारने त्याच्या एका व्हॉगमध्ये आपण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असल्याचं म्हटलंय. आपली वेगवेगळ्या राज्यांमधील उच्च अधिकाऱ्यांशी ओळख असल्याने आपण अडकलेल्या भारतीयांना देशाबाहेर काढण्यासाठी मदत करु शकतोय असं तो म्हणालाय. कुमारशिवाय त्याचा भाऊ राम बांदीनेही युक्रेनबाहेर जाण्यासाठी भारतीयांना चार बसची सोय करु दिलीय.

कुमारच्या त्याच्या मित्रांनी, कुटुंबियांनी या दोन्ही मोठ्या प्राण्यांना तिथेच सोडून भारतात परतण्यास सांगितलं आहे. नुकतीच कुमारने आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्षनेते चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. यावेळी झूम कॉलवर त्याने तेथील परिस्थिती सांगितलं. आपण देशाबाहेर पडू शकतो एवढे पैसे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत असं सांगतानाच कुमारने आपण देश न सोडण्याचा निर्णय घेतलाय असं स्पष्ट केलंय. आपण आपल्या पाळीव प्राण्यांसोबतच राहणार असल्याचं त्याने म्हटलंय. हे प्राणी आपल्यासाठी मुलांप्रमाणे आहेत. मी त्यांना सोडून जाण्याचा विचारही करु शकत नाही असं त्याने म्हटलंय.

हेही वाचा :  'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम

“मी त्यांना सोडून गेलो तर ते नक्कीच मरतील. मला हे परवडणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत त्याचं रक्षण करेन. जरी मी मेलो तरी त्यांच्यासोबतच मरेन,” असं त्याने एका व्हॉगमध्ये म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …