Kitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना ‘या’ टिप्स

Kitchen Hacks: आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी प्रत्येक भांड्याचा उपयोग होतो. पण एक असं भांड आहे जे प्रत्येक घरात न चुकता वापरलं जात आणि ते म्हणजे प्रेशर कुकर…कमीवेळेत जेवण शिजवण्याची उत्तम पर्याय म्हणजे प्रेशर कुकर.. प्रेशर कुकरचा वापर करणं हे खूप सोपं आहे यामुळे जेवणासाठी लागणारा वेळसुद्धा वाचतो. प्रत्येक घरात एक संवाद आपण नेहमी ऐकतो ;;तीन शिट्या झाल्या कि कुकर बंद करा ” आई आपल्याला हे सांगताना आपण लहानपासून  ऐकलं असेल… 

शिटी वाजली कि जेवण शिजलंय असं त्याचा संकेत असतो. त्यामुळे ठराविक शिट्ट्या झाल्या कि कुकरमध्ये  जेवण शिजून तयार आहे असं आपण समजतो आणि गॅस बंद करतो..  (pressure cooker hacks)

पण जेव्हा हाच कुकर साफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकी नऊ येतात…प्रेशर कुकरची शिट्टी दिसायला लहान असते पण तिला साफ कारण खूप कटकटीचं काम होऊन जात.

पण आता यावरसुद्धा एक उपाय सापडला आहे. काही स्मार्ट टिप्स (smart tips ) आहेत जे वापरून तुम्ही खराब काळी झालेली कुकरची शिट्टी नव्यासारखी चमकवू शकता.  (cooker whistle cleaning )

हेही वाचा :  Nitin Gadkari: "पुढील निवडणुकीत मी बॅनर-पोस्टर लावणार नाही, कोणाला चहा पाजणार", असं का म्हणाले गडकरी?

चला जाणून घेऊया काय आहेत या स्मार्ट टिप्स 
गरम पाण्याने साफ करा 
कुकरची काळी पडलेली शिट्टी  साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. गरम पाणी करून त्यात काही वेळासाठी ही शिट्टी बुडवून ठेवा, पाण्यात भिजल्यामुळे डाळ किंवा भाजीचे सुकलेले डाग ओले होऊन पटकन निघतील. (Kitchen Tips: clean pressure cooker whistle hacks in marathi )

इयरबडचा वापर करा 
प्रेशर कुकरमध्ये डाळ किंवा भाजी शिजवतो तेव्हा त्याचे छोटे कण शिट्टीमध्ये येऊन बसतात, यामुळे शिट्टी पिवळी होते आणि ते साफ करणं कठीण होऊन बसतं. यासाठी इयरबड्सवर थोडासा साबण लावून आणि शिट्टीच्या आतमध्ये साफ करून घ्या असं केल्याने शिट्टी साफ होईल. 

लिक्विड डिशवाॅश 
बाजारात प्रत्येक प्रकारचे लिक्विड वॉश असतात. जळालेले डाग तडक्याचे डाग असतील तर ते साफ होतात. एका वाटीत पाणी घ्या त्यात डिश वॉशर टाका यात शिट्टी काहीवेळ भिजवून ठेवा याने शिट्टी चांगली साफ होईल 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …