kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत

Kitchen hacks: बऱ्याचदा जेवण बनवताना किंवा गरम करताना लोकांकडून अनेक चुका होतात, ज्यामुळे जेवणाची चवच बिघडत नाही, तर भांडी देखील खराब होतात. ज्यामुळे आपल्याला सगळं साफ करणं देखील कठीण होतं. हे जेवण खऱ्याब झाल्यामुळे ते पुन्हा बनवण्याची चिंता तर महिलांना असते. त्याचबरोबर त्यांना हे जळलेलं भांड साफ करण्यासाठी देखील जास्त कसरत करावी लागते.

त्यात भांडी नीट साफ केल्या तरी देखील भांड्यांवरील जळलेल्या आणि करपलेल्या खुना पूर्ण जात नाहीत. जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला किचन हॅक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला भांडी साफ करताना जास्त त्रास होणार नाही.

करपलेलं भांड कसं साफ करावं

स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा. हे करताना लक्षात ठेवा, कुकरची शिट्टी लावू नका किंवा कुकरचे झाकण बंद करू नका. 

हेही वाचा :  असं काय घडलं? बायकोने नवऱ्याला चिमट्याने धुतलं अन् त्यानं पोलीस स्टेशन गाठलं!

तसेच लक्षात ठेवा की ही टिप्स कास्ट आयर्न भांडीवर काम करणार नाही. 

अ‍ॅल्युमिनियम भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप

अ‍ॅल्युमिनिअमची कढई असो किंवा कुकर, वारंवार वापरल्यास ती भांडी काळी पडतात. खरं तर, अ‍ॅल्युमिनियमची भांडी त्यांची चमक फार लवकर गमावतात. अशा स्थितीत ते स्वच्छ करण्यासाठी भांडे गॅसवर ठेवून त्यात वरुन पाणी टाकावे. आता त्यात दोन चमचे मीठ आणि १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर टाका. जर भांडे खूपच खराब झाले असेल तर, त्यात अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता. या टिप्सचे पालन केल्याने, भांडी पूर्णपणे स्वच्छ होतील.

काचेचे ग्लास, पोर्सिलेनची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

काचेच्या भांड्यांवरते डाग काढायचे असतील तर ते व्हिनेगर, पाणी आणि डिश वॉश साबण यांच्या मिश्रणात थोडावेळ ठेवा. तसेच भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी कोमट असावे हे लक्षात ठेवा. यामध्ये तुम्ही भांडी ठेवल्यामुळे त्यावरील संपूर्ण डाग निघून जातील.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …