Cooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे…तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट…ही घ्या रेसिपी

How to Make perfect dosa at home: रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो, बरं रोज-रोज तोच नाश्ता करून कंटाळा सुद्धा येतो मग  घरातून फर्माईश येते कि आज काहीतरी नवीन खायचं आहे ,पण नेमकं काय नवीन खाऊ बनवायचा आणि त्यात बऱ्याचदा होत असं कि नवीन काहीतरी करायच्या नादात आपला पदार्थ बिघडून जातो आणि मग होते पंचाईत. (easy quick breakfast recipe ideas)

पोहे उपम्यासोबत आपल्याकडे साउथचे इडली डोसेसुद्धा (idali, dosa ) मोठ्या प्रमाणात बनवले जातात, पण बऱ्याचदा डोसे बनवताना ते चिकट,गचगचीत बनतात वातट होतात, डोश्यांचं पीठ हवं तस भिजलं जात नाही

आणि आता तर थंडी चालू झाली आहे अश्यात पीठ लवकर आंबतसुद्धा नाही. (Instant dosa Recipe) आणि मग डोसे एकतर तव्याला चिकटत राहतात नाहीतर एकदम प्लॅन दिसतात.

अगदी कुरकुरीत जाळीदार परफेक्ट डोसा कसा बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही त्रास देत असेल तर परफेक्ट हॉटेल स्टाईल डोसा तोही काहीच मिनिटात कसा बनवायचा. थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.

रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)

हेही वाचा :  दोन बायकांचा एकच नवरा! 'ही' अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

चला तर जाणून घेऊया सोपी आणि इन्सटंन्ट डोसा रेसिपी 

साहित्य

  1. तांदूळ भिजवून घ्या – १ कप 
  2. किसलेला नारळ- १ कप 
  3. गरजेनुसार पाणी 
  4. ड्राय यीस्ट – १ चमचा
  5. साखर – १ चमचा
  6. मीठ – चवीनुसार

कृती 

जाळीदार डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड घ्या त्यात आधी भिजवलेले तांदूळ घ्या ते दळून घ्या दळल्यानंतर याचे दोन भाग करून घ्या.

अर्ध मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढा आणि उरलेलं  पातळसर मिश्रण एका पॅनमध्ये काढून घ्या,काही वेळ हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या आणि थंड होऊ द्या .

हे मिश्रण थंड झाल्यावर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्या.  आता यात गरजेनुसार साखर मीठ ड्राय यीस्ट घालून थोडावेळ झाकून ठेवा

या नंतर मिश्रण चांगल्यापैकी फुगेल डोश्यांचं इन्स्टंट पीठ तयार आहे आता फक्त डोसे घालण्याच्या तव्यावर मस्त डोसे बनवा खायला कुरकुरीत खमंग आणि जाळीदार डोसे बनवून तयार. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर akshayaascameo  नावाने एक गृहिणी कूकिंगचे वेगवेगळे धडे देत असते त्यांनीच त्यांच्या पेजवर हा सोपा डोसे बनवण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. चला तर मग तुम्ही झटपट डोसे घरी एकदा नक्की करून पहाच.

हेही वाचा :  Job News : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना झटका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …