Job News : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा नियमांमध्ये बदल; भारतीयांना झटका

Saudi Arabia Foreign Work Visa: नोकरीच्या निमित्तानं अनेकजण परदेशाची वाट धरतात. यामध्ये आखाती देशांकडे वळणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा आहे. तुमचंही कोणी जर असंच कामानिमित्त  परदेशात असेल तर ही बातमी महत्त्वाची. कारण, ठरतंय व्हिसाचे बदललेले नियम. 

सौदी अरेबियानं नुकतंच व्हिसामध्ये काही बदल केले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इथं नोकरीच्या निमित्तानं येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या दृष्टीनं हे नियम आखण्यात आले आहेत. सौदी अरेबियातील मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या वतीनं हे नियम जारी करण्यात आले असून, त्यानुसार 2024 या वर्षापासून 24 वर्षांहून कमी वयाचा नागरिक कोणत्याही घरगुती मदतीसाठी कोणत्याही परदेशी नागरिकाला/ कामगाराला कामावर ठेवू शकत नाही. 

वरील नियमानुसार सौदीचे नागरिक, सौदी अरेबियाकील पुरुषांच्या परदेशी पत्नी, त्यांची आई, सौदीचं प्रीमियम परमिट असणाऱ्या परदेशी घरगुती मदतनीसांच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात. स्थानिक श्रम क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. ज्यामुळं मुसनेड प्लेटफॉर्म एसटीसी पे आणि उरपे अॅप यांसारख्या डिजिटल सॅलरी ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी होती. 

नियमाचा भारतीयांवर काय परिणाम? 

सौदी अरेबियामध्ये लागू करण्यात आलेल्या या नियमाचा भारतीय श्रमजीवींवर मोठा परिणाम होणार आहे. किंबहुना त्यांचं नुकसानच होणार आहे. सौदी अरेबियामध्ये मोठ्या संख्येनं युवा पिढी स्वतंत्र राहते. पण, नव्या नियमामुळं आता ही मंडळी त्यांच्या घरी कामासाठी मदतनीस ठेवू शकणार नाहीयेत. ज्यामुळं रोजगाराची संख्या मोठ्या फरकानं कमी होणार आहे. 

हेही वाचा :  शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाताही व्हायला हवे!; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन | meaning of oil National Highways Minister Nitin Gadkari Farmers akp 94

उपलब्ध माहितीनुसार सौदी अरेबियामध्ये घरगुती कामांसाठी वाहन चालक, आचारी, सुरक्षा रक्षक, माळी, नर्स, शिवणकाम करणारे आणि घरातील कामांमध्ये मदत करणारे अशा विविध पदांसाठी गरजवंतांना नोकरी दिली जाते. सध्याच्या घडीला सौदीमध्ये 26 लाख भारतीय कामाच्या निमित्तानं वास्तव्यास आहेत. येत्या काळात मात्र या नव्या नियमामुळं हा आकडा मोठ्या फरकानं कमी होऊ शकतो. 

व्हिसासाठीच्या अटी… 

सौदी अरेबियानं व्हिसासाठी आखलेल्या नियमांमध्ये काही आर्थिक बाबींवरही लक्ष टाकण्यात आलं आहे. ज्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा व्हिसा दिला जातो तेव्हा तुम्हाला वेतनाची माहिती द्यावी लागते. ज्यामध्ये फर्स्ट व्हिसा जारी करण्यासाठी बँकेत 40000 सौदी रियाल असणं गरजेचं असतं. सेकंड व्हिसासाठी किमान वेतन 7000 सौदी रियाल असावं आणि बँकेत 60000 सौदी रियाल इतकी रक्कम असावी. थर्ड व्हिसासाठी किमान वेतन 25000 सौदी रियाल आणि बँकेत 200000 सौदी रियाल इतकी रक्कम असणं बंधनकारक आहे. इतकंच नव्हे, तर आता सौदीमध्ये वर्क व्हिसाचा कालावधी दोन वर्षांहून कमी करत परदेशी नागरिकांसाठी तो एका वर्षावर आणण्यात आला आहे. त्यामुळं या बदलांची नोंद करण्याचं आवाहन यंत्रणा करत आहेत. 

हेही वाचा :  फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज? बंगल्यातून बाहेर पडणं टाळलं

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …