Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय

Bank Strike Latest News : राज्य शासनानं नुकतीच 2024 या वर्षातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पुढच्या वर्षात सरकारी खात्यात नोकरीवर असणाऱ्यांवर सुट्ट्यांची बरसात होणार असल्याचं जाहीर केलं. थोडक्यात या दिवसांना बहुतांश बँकाही बंद असणार आहेत. पण, तत्पूर्वी डिसेंबर महिन्यातही बँका बऱ्याच दिवसांसाठी बंद राहणार असून, त्यामुळं खातेधारकांची मोठी गैरसोय होणार आहे. 

डिसेंबर महिन्यातील विविध दिवशी विविध बँकांमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बंक एंप्लॉई असोसिएशन (AIBEA) कडून यासंदर्भातील माहिती देणारं एक पत्रक जारी करण्यात आलं. जिथं 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहतील असं सांगण्यात आलं. PTI च्या माहितीनुसार 4 डिसेंबरला हा संप सुरु होणार असून, तो 11 डिसेंबरला संपणार आहे. 

संपाच्या हाकेमुळं कोणकोणत्या बँका कधी बंद राहतील? 

  • 4 डिसेंबर 2023- भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँकेतील कर्मचाऱ्यांचा संप 
  • 5 डिसेंबर 2023 – बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियामध्ये संप 
  • 6 डिसेंबर 2023 – कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये संप 
  • 7 डिसेंबर 2023 – इंडियन बँक, युको बँकेतील कर्मचारी संपावर 
  • 8 डिसेंबर 2023 – युनियन बँक, इंडिया बँक, बँक ऑफ महाराष्ट्रचा संप 
  • 9,10 डिसेंबर 2023 – शनिवार, रविवार असल्यामुळं बँकांची साप्ताहिक सुट्टी 
  • 11 डिसेंबर 2023 – खासगी बँकांमधील कर्मचारी संपावर 
हेही वाचा :  राज्याचा अर्थसंकल्पांची ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …