’10 हजारात काम करणाऱ्या मुलीने…’; ‘त्या’ वादग्रस्त विधानामुळे ‘कोकण हार्टेड गर्ल’वर टीकेची झोड

Kokan Hearted Girl Instagram Post: इन्स्टाग्रामवर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अंकिता वालावलकरने केलेल्या एका पोस्टमुळे ती टीकेची धनी ठरत आहे. अंकितावर सध्या टीकेची झोड उठली आहे. अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर केलेला एका वादग्रस्त विधानावरुन तिला ट्रोल केलं जात आहे. अंकिताच्या डोक्यामध्ये प्रसिद्धीची हवा केली आहे, अंकिता अहंकारी झाली आहे असं म्हणत अनेकांनी तिला झापलं आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

अंकिता वालावलकरने आठवडाभरापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवर आजही चर्चा सुरु आहे. ‘वास्तव’ अशी कॅप्शन देत एक किस्सा सांगितला. या व्हिडीओमध्ये अंकिताने एक दुकान खरेदी केलं असून त्यामध्ये काम करण्यासाठी एका मुलीच्या शोधात होती. अंकिताने कळवलेल्या माहितीनुसार एका मुलीने तिच्याशी संपर्क साधला. अंकिताने तिला कामासंदर्भात सर्व माहिती दिल्यानंतर दुकानामध्ये झाडूही मारावा लागेल असं सांगितलं. मात्र हे ऐकून या मुलीने अंकिताला नकार दिला. या मुलीने झाडू मारावा लागेल यासाठी दिलेला नकार अंकिताला पचला नाही आणि त्यावरुनच तिने आपली भूमिका मांडणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. 

अंकिताने कमेंट करुन मांडली भूमिका

अंकिताचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेण्याऐवजी त्या मुलीची भूमिका योग्य असल्याचं म्हणत अंकितालाच सुनावलं. अनेक नकारात्मक कमेंट्स पाहून अंकिताने या पोस्टवर एक कमेंट केली. “दुकानामध्ये झाडू मारायला एरियापण 100 स्वेअर फूट असेल. माझ्याकडे काम करणारी व्यक्ती ही जास्तीत जास्त 10 हजार पगार असणारी असेल. त्यामुळे माफक अपेक्षा एवढी आहे की समोर कचरा दिसला तर डिग्री न आठवता झाडू आठवावी ज्याचा आपण कचरा काढण्यासाठी वापर करतो,” असं अंकिता म्हणाले. 

हेही वाचा :  गडगंज श्रीमंत अंबानी घराण्याची सून होण्यासाठी श्लोका व राधिकाने दिल्या या परीक्षा, मगच मिळाली कुटुंबात एंट्री

अंकिताचं वादग्रस्त विधान

मात्र यानंतर अंकिताने केलेलं विधान पाहून अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली. “10 हजार रुपयांमध्ये काम करणाऱ्या मुलाने किंवा मुलीने आत्मसन्मान हा प्रकार बोलू नये. झाडू मारल्याने कसला रिस्पेक्ट कमी होत असेल तर तुम्ही मुंबईमध्ये बीएमसीत काम करणाऱ्या लोकांचं शिक्षण तपासून बघा,” असं अंकिता म्हणाली. या प्रतिक्रियेमध्ये अंकिताने पैशांमध्ये आत्मसन्मानाची तुलना केल्याचं अनेकांना आवडलं नाही. बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया नोंदवून अंकितावर टीका केली आहे.

अनेकांनी केली टीका

काहींनी कोकण रिफायनरीच्या आंदोलनाच्या वेळेस कुठे होती असा सवाल अंकिताला विचारला तर काहींनी तिच्या डोक्यात नशा गेल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी तू हे विधान करुन आमच्या लेखी तुझी किंमत कमी करुन घेतल्याचं कमेंट करुन म्हटलं आहे. सोशल मीडियावरील कमेंट्स तुम्हीच पाहा

अंकिताने मांडलेलं हे तर्क अनेकांना पटलेलं नाही. म्हणूनच पोस्ट केल्यानंतर आठवड्याभरानंतरही तिची ही पोस्ट चर्चेत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …