Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरु झाला आहे. बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडला आहे. तरीदेखील तुम्ही बँकांची कामं केली नाहीत? मग त्वरित करुन घ्या. कारण एप्रिल महिन्यात जवळपास 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता घाई केली नाही तर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल. (Bank Holiday List in April)

नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आजपासून अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. जे तुमच्या खिशावर परिणाम करतील. हे बदल बँक ग्राहक करखात्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असतील. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं नुकसानही होऊ शकतं. 

आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking)  लोकांची बरीचशी कामं घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेत तुम्हाला जावं लागतं. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी एका क्लिकवर जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी…

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in April 2023) 

1 एप्रिल 2023 : वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील. 

हेही वाचा :  राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

2 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

4 एप्रिल 2023 : महावीर जयंती

5 एप्रिल 2023 : बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त तेलंगणामध्ये बँका बंद राहतील.

7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडेमुळे आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

8 एप्रिल 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार

9 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

14 एप्रिल 2023 : बाबासाहेब आंबेडकर जयंती

15 एप्रिल 2023 : आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुअनंतपुरममध्ये विशू, बोहाग बिहू, हिमाचल डे, बंगाली नववर्षामुळे बँका बंद राहतील. 

16 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 एप्रिल 2023 : जम्मू आणि श्रीनगरमध्ये शब-ए-कद्र रोजी बँका बंद राहतील. 

21 एप्रिल 2023 : ईद-उल-फित्रमुळे आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील. 

22 एप्रिल 2023 : महिन्याचा चौथा शनिवार

23 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

30 एप्रिल 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …