जुळ्या बाळांपैकी गर्भातच एक होऊ शकते गायब, तुम्हाला हा आजार तर नाही?

बाळाचा जन्म म्हणजे आपल्याकडे सोहळा असतो आणि त्यातही जुळी मुलं होणार कळल्यानंतर तर आनंद गगनात मावत नाही. पण अचानक प्रेग्नंट महिलेच्या पोटात जुळ्या मुलांपैकी एक गायब होऊ शकते. वाचून दचकलात ना? हो हे खरं आहे. वास्तविक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या स्थितीला वॅनिशिंग ट्विन सिंड्रोम असं म्हटलं जातं. ज्यामध्ये गर्भात दोन बाळ असूनही एकाचा मृत्यू होतो आणि गरोदर आईला याबाबत समजतही नाही. आजकाल अशा अनेक केस समोर येत आहे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनने याबाबत रिसर्च केला असून १९४५ मध्ये अशी घटना पहिल्यांदा घडली होती. यामध्ये भ्रूणातले फेटल टिश्यू दुसऱ्या बाळाला आपल्या आतमध्ये शोषून घेतात. नक्की काय आहे Vanishing Twin Syndrome त्याची लक्षणे आणि कारणे घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Freepik.com)

काय आहे Vanishing Twins Snyndrome

​वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमचे कारण​

​वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमचे कारण​

Reason Of Vanishing Twin Syndrome: अनेकदा महिलांना गरोदरपणात सुरूवातीच्या तपासणीतच जुळी मुलं असल्याचे समजते. मात्र काही काळानंतर एक गर्भ गायब होतो. पण जन्म देताना एकाच मुलाला जन्म दिला जातो. रिसर्चनुसार, सुरूवातीला आईच्या पोटात दोन गर्भ वाढतात. पण त्यापैकी एका गर्भाला योग्य अन्न, रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन व्यवस्थित होत नाही अथवा गरोदर महिलेला जास्त तणाव आल्यास, गर्भात वाढणाऱ्या एका बाळाचा विकास खुंटतो. याच कारणामुळे एक गर्भ नष्ट होऊ लागतो. ज्या बाळाला योग्य ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा मिळतो ते बाळ वाचते आणि दुसरा गर्भ पोटातच नष्ट होतो.

हेही वाचा :  प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे?

​काय आहेत वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमची लक्षणे​

​काय आहेत वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमची लक्षणे​

Symptoms Of Vanishing Twin Syndrome: अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या रिसर्चनुसार, वॅनिशिंग ट्विन सिंड्रोम हे ३० पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. याची लक्षणे म्हणजे बरेचदा गरोदर महिलेला हलकेसे ब्लिडिंग होते. तुम्हाला जुळ्या मुलांबाबत डॉक्टरांनी जर निश्चित सांगितले असेल तर पोटात गोळा येत असल्यासारखे वाटत असेल अथवा ब्लिडिंग झाले तुमच्या पोटातील एका बाळाचा विकास होणे बंद झाले आहे हा तुम्हाला इशारा मिळू लागतो. पण तुम्ही घाबरून न जाता त्वरीत तुमच्या डॉक्टरांकडे संपर्क साधावा.

(वाचा – वॉटर बर्थ थेरपी म्हणजे नेमके काय? कसा होतो बाळाचा जन्म आणि गर्भवतीच्या यातना होतात कमी )

​काय आहेत वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमवर उपचार​

​काय आहेत वॅनिशिंग ट्विन सिंड्रोमवर उपचार​

Treatment Of Vanishing Twin Syndrome: अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनमनुसार, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात गरोदर महिलेने एक बाळ गमावल्यास, काही विशेष वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र अशा परिस्थितीत ब्लिडिंग होणे अथवा पोटातून कळ येणे याकडे दुर्लक्ष करू नका. तर त्वरीत डॉक्टरांकडे जा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळाल्यास बाळ वाचू शकते. त्यामुळे जुळ्या बाळांची जाणीव झाल्यानंतर या लहानसहान गोष्टींकडेही लक्ष ठेवा.

हेही वाचा :  All About Miscarriage: कधी होऊ शकतो गर्भभात, काय आहेत लक्षणे

(वाचा – वयाच्या ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेताय, तर या गोष्टींची होईल मदत)

​वेळोवेळी करा तपासणी​

​वेळोवेळी करा तपासणी​

दुसऱ्या वा तिसऱ्या महिन्यात जर जुळ्या बाळांपैकी एक गायब झाले तर पुढे दुसऱ्या बाळाच्या वाढीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आईने वेळोवेळी गर्भात वाढणाऱ्या बाळाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करत राहावी. यामुळे बाळ वाचते आणि त्याचा व्यवस्थित विकास होतो.

टीप – याबाबत तुम्ही अधिक माहिती तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून मिळवू शकता. ही माहिती आम्ही रिसर्चच्या आधारे दिली आहे.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …