All About Miscarriage: कधी होऊ शकतो गर्भभात, काय आहेत लक्षणे

गर्भपात होण्यासारखे दुःख नाही. कोणत्याही महिलेला या त्रासातून जावं लागतं त्यावेळी होणारी वेदना, शारीरिक आणि भावनिक त्रास हा अत्यंत वाईट असतो. साधारणतः पहिल्या तीन महिन्यामध्येच गर्भपात होतो. त्यामुळेच गुड न्यूज आहे हे समज्यावर नक्की गुड न्यूज कधी द्यायची असा प्रश्न पडतो. पण पहिले तीन महिने कधीच कोणाला सांगू नये. याबाबत डॉ. नुपूर गुप्ता, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ज्ञ, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याकडून माहिती मिळाली आहे. कधी कधी गर्भपाताचे योग्य कारण समजणे कठीण असते. पण गर्भपात थांबविण्यासाठी नक्कीच उपाय करू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती सविस्तरपणे

First Trimester मध्ये गर्भपात होण्याचे कारण

first-trimester-

पहिल्या तिमाहीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक अबॉर्शन क्रोमोसोम या जेनेटिक अबनॉर्मेलिटीच्या कारणामुळे होतात. भ्रूण अर्थात गर्भात वाढणाऱ्या जीवामध्ये काही डॅमेज असेल उदा. हृदयाची गती अधिक नसणे, विकास न होणे, वाढ न होणे अशा केसमध्ये जीव राहात नाही. तर दुसरे कारण म्हणजे ब्लिडिंग अथाव ब्लड क्लॉट असणे. कोरियोनिक रक्तस्रावदेखील बाळ न राहण्याचे मोठे कारण ठरू शकते. काही महिलांच्या बाबतीत ज्यांचे दोन – तीन वेळा आधी अबॉर्शन झाले असेल त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झाल्यामुळे भ्रूण टिकत नाही. ज्याला अँटी-फॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रॉम असे म्हटलं जातं. तसंच युट्रीन डिफॅट्स आणि गर्भाशय दोष म्हणजेच प्लेसेंटल समस्यांमुळेदेखील पहिल्या तिमाहीत गर्भपात होऊ शकतात.

हेही वाचा :  गरोदरपणात चुकूनही करू नका घरची ही ५ कामं, छोटीशी चूकही गर्भपाताच कारण बनेल

Second Trimester मध्ये गर्भपाताचे कारण

second-trimester-

गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये साधारण १३ ते २० आठवडे झालेले असतात. यादरम्यान गर्भपात होणे म्हणजे साधारण इन्फेक्शनमुळेही होऊ शकते. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडची परिस्थिती, ऑटोइम्यून डिसऑर्डर्स, फायब्रॉईड अथवा युट्रसमध्ये जेनेटिक डिफेक्ट अशा वैद्यकिय समस्यांमुळे दुसऱ्या तिमाहीत गर्भपाताची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणा होण्याआधी आणि झाल्यानंतर धुम्रपान, दारू पिणे, अधिक कॅफिने घेणे, ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण यामुळे अधिक घनिष्ठ परिणाम शरीरावर होऊन गर्भपात होण्याचा धोका संभवतो.

Third Trimester मधील गर्भपाताचे कारण

third-trimester-

गर्भावस्थेतील शेवटची स्टेज म्हणजे तिसरी तिमाही. या दरम्यान होणारा गर्भपात म्हणजे मृत जन्म अथवा स्टिल बर्थ म्हटले जाते .पहिल्या दोन तिमाहीमध्ये ज्या गोष्टी कारणीभूत ठरतात, त्याच गोष्टींमुळे बाळाला तिसऱ्या तिमाहीतही धोका असतो. पण तिसऱ्या तिमाहीतील कारण समजणे अत्यंत कठीण होते. याचे योग्य कारण आजपर्यंत कळू शकलेले नाही.

गर्भपाताची अन्य कारणे

  • गरोदरपणातील गुंतागुंत – यामध्ये प्रीटर्म लेबर अर्थात गर्भ हा नाळेपासून वेगळा होण्याची शक्यता असते
  • बर्थ डिफेक्ट्स – १० मध्ये एका केसमध्ये स्टिलबर्थ अनुवंशिकता अथवा स्ट्रक्चरल बर्थ डिफेक्टचा परिणाम होताना दिसतो
  • उच्च रक्तदाब – प्रिक्लेम्पसिया सर्व गरोदरपणामध्ये ५ ते ८ टक्के असतो. सर्वात जास्त धोका हा बाळाच्या आईला असतो. यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्व न मिळाल्याने गर्भपात होतो
  • नियंत्रणात नसलेल्या मधुमेहामुळे गर्भपात
  • इन्फेक्शन – नाळ अथवा फिटसला होणारे इन्फेक्शन हे गर्भपाताचे कारण
  • नाळेची समस्या – बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकणे. यामुळे बाळाला ऑक्सिजन मिळत नाही आणि योग्य रक्तपुरवठादेखील होत नाही
हेही वाचा :  केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

गर्भपाताची लक्षणे

  • तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस स्पॉटिंग होत असल्यास
  • क्लॉट, टिश्यूज समाविष्ट असणारा रक्तस्राव
  • हलके अथवा गंभीर दुखणे, पाठीतून आणि पोटातून कळा येणे
  • वजन अचानक कमी होणे
  • योनिमधून डिस्चार्ज होणे
  • सतत उलट्या होणे अथवा स्तन सैलसर होणे

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे वाटत असतील तर तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. यापैकी कोणत्याही गोष्टी अंगावर काढण्यासारख्या नाहीत.

कसा थांबवावा गर्भपात?

गरोदर राहण्याची योजना आखत असाल तर त्याच्या तीन ते चार महिने आधीपासूनच ४०० मायक्रोग्रॅम फोलिक अॅसिड सप्लीमेंट घ्यावे. याशिवाय तुम्ही तुमची लाइफस्टाईल हेल्दी बनविण्याकडे अधिक लक्ष द्या. नेहमी हायड्रेटेड राहावे. नियमित स्वरूपात व्यायाम करणे आणि किमान ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिगारेट, दारू अथवा ड्रग्ज घेऊ नयेत. पॅसिव्ह स्मोकिंगही टाळावे. याशिवाय कॉफी, चहा यांचे सेवन बंद करावे. तसंच या नऊ महिन्यात योग्य लसीकरण करून घ्यावे. अजिबात विसरू नये. तसंच मधुमेह, रक्तदाब या समस्यांकडे लक्ष द्यावे. योग्य वेळी तपासणी करत राहावे. धावाधाव करू नये. व्यवस्थित आराम करावा. तसंच कायम आराम करत राहू नये. पण अवजड वस्तूंपासून दूर राहावे.

हेही वाचा :  १० प्रकारच्या लोकांनी दुधाला तोंडही लावू नये, हाडांमधील कॅल्शियम खेचून निघेल, कॅन्सरचाही धोका, रिसर्चमध्ये दावा

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …