गरोदरपणात चुकूनही करू नका घरची ही ५ कामं, छोटीशी चूकही गर्भपाताच कारण बनेल

Household work during pregnancy : गर्भधारणा ही एक असा नाजूक काळ आहे. जेव्हा तुम्हाला अगदी रोजची काम करताना देखील विशेष काळजी घ्यावी लागते. याकाळात शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही त्रास होत असतो. अशावेळी महिलांनी काही बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

असंख्य महिला गर्भधारणेच्या काळात काम करत असतात. आणि त्यांनी ते करणे देखील गरजेचे आहे. या काळातील हालचाल फायदेशीर ठरते. डॉक्टर देखील या काळात ऍक्टिव राहण्याचा सल्ला देतात. मात्र घरातील काही कामे अशी असतात जी गर्भधारणेच्या काळात शक्य झाल्यास थोडे टाळावे किंवा ते करताना फारच काळजी घ्यावी. अन्यथा या ५ घरगुती कामांमुळे गर्भपात (miscarriage) होण्याची शक्यता असते.

जिने वर-खाली करणे

गर्भवती महिलांचं वजन या दरम्यान वाढतं. अशावेळी त्यांना स्वतःला सावरणं थोडं कठीण होतं. किंवा काहीच महिलांना याचा त्रास जाणवतो. अशावेळी त्यांनी जिने वर-खाली करण्याचं काम कटाक्षाने टाळायला हवं. अनेकदा कपडे धुऊन सुकत घालण्याकरता गर्भवती स्त्रिया वर-खाली करतात. या गोष्टी टाळणं आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

हेही वाचा :  ‘ब्रा’लेट टॉप घालून सुपरसेक्सी दिसणा-या पलक तिवारीसमोर मलायका अरोराही फेल

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​जास्तीचं वजन उचलणे

जड वजन उचलणे हे गर्भवती महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही आणि असे केल्याने त्यांना त्रास होऊ शकते. पाण्याने भरलेली बादली किंवा इतर जड वजन उचलल्याने गर्भवती महिलेच्या पोटावर ताण येतो, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. गर्भधारणेच्या महिन्यानुसार तुम्ही किती वजन उचलू शकता हे जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला. जवळ असलेल्या व्यक्तीची मदत घ्या.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​गर्भधारणेदरम्यान वाकणे

गर्भवती महिलांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की त्यांनी सतत वाकणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. वाकल्यामुळे त्यांच्या ओटीपोटावर दबाव येतो, ज्यामुळे आतील स्नायू देखील ताणले जातात. काही गर्भवती महिलांमध्ये, वारंवार वाकल्याने गर्भधारणेचा धोका वाढू शकतो. त्यामुळे असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा वळावे लागेल.

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

हेही वाचा :  क्रॉप शर्ट घालून मलायका अर्जुन कपूरसोबत पोहचली डेटला

​गर्भधारणेदरम्यान विजेचे काम

गरोदर स्त्रिया केवळ जड कामच करत नाहीत तर अशी अनेक सामान्य छोटी कामे आहेत जी करू नयेत. कोणत्याही चालू असलेल्या इलेक्ट्रिक मशीनच्या संपर्कात येऊ नये हे नेहमी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ फ्रीज, कॉफी मशीन किंवा कॉम्प्युटर म्हणजे घरात जर या गोष्टींमुळे शॉक लागत असेल तर गर्भवती महिलेने तेथे जाणे टाळावे. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव ते पुन्हा पुन्हा वापरावे लागतील, तर ते आधीपासून नीट तपासा. कारण थोडासा विजेचा धक्काही गर्भात असलेल्या बाळाला हानी पोहोचवू शकतो.

(वाचा – साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने भगवान बुद्धांच्या नावावरून ठेवलं मुलांच नाव, मुलं होईल अतिशय संयमी)

​गर्भधारणेदरम्यान रसायनांचा संपर्क

अनेक वेळा गरोदर स्त्रिया विचार करतात की त्यांना कोणतेही जड काम करावे लागणार नाही आणि म्हणून ते कधीकधी साफसफाई करणे इत्यादी हलकी कामे करू लागतात. स्वच्छतेमध्ये शरीरावर कोणताही ताण येत नाही, परंतु यावेळी वापरण्यात येणारी उत्पादने देखील हानिकारक असू शकतात. काही साफसफाईच्या उत्पादनांमध्ये धोकादायक रसायने असतात, ज्याच्या संपर्कात गर्भवती स्त्री आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचते. त्यामुळे शक्यतो अशा रसायनांच्या संपर्कात येऊ नका.

हेही वाचा :  Breakup नंतर ही अभिनेत्री झालीये अधिक ग्लॅमरस आणि ब्युटीफूल, मोनोकिनीतील अदा करत आहेत घायाळ

(वाचा – ‘आता रडायचं नाही लढायचं’, संजय राऊतांनी मुलगी पूर्वशीच्या साथीचं केलेलं कौतुक, असं फुलतं बाप-लेकीचं नातं))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …