प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रथा पाहायला मिळतात. प्रथा या काळानुसार बदलतात पण काही गोष्टी या पिढी दर पिढी पाळल्या जातात. प्रेग्नंसी ही प्रत्येक महिलाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. पण या काळात गर्भवती महिला अनेक गोष्टीमधून जात असतात. भारतात असणाऱ्या प्रथा किंवा चालीरिती देखील खूपच महत्त्वाची भूमिका पार पाडतात. असेच एक मिथक आहे ते म्हणजे प्रेग्नंसीमध्ये केस धुवू नये. हा काळ नाजूक असल्याने महिला देखील अनेक गोष्टी मानतात. प्रेग्नंसीमध्ये केस धुता येतात का ? केस धुतल्याने मासिक पाळी तर घेणार नाही ना ? असे 100 प्रश्न अनेक महिलांना पडलेले असतात. यावर स्त्रीरोगतज्ज्ञ सुप्रिया पुराणिक यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : – istock)

महिलांना पडणारे सामान्य प्रश्न

महिलांना पडणारे सामान्य प्रश्न

गरोदरपणाच्या काळात महिल्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. सर्वसाधारण महिलांना पडणारे प्रश्न

  1. गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर केस धुणे योग्य आहे का ?
  2. गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी
  3. प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ?
  4. केस धुणे बाळासाठी धोकादायक ठरतं का ?
हेही वाचा :  "मुलीला कसं सांगू की तिचा भाऊच तिचा बाप आहे," महिलेने उघड केलं कुटुंबाचं धक्कादायक सत्य

(वाचा :- काहीही खाताना – पिताना लिपस्टिक निघून जाते मग फॉलो करा या सिंपल टिप्स)​

हे आहे सत्य

भारतातील प्रचलित मिथक

भारतातील प्रचलित मिथक
  • मासिकपाळीच्या दिवसात केस धुवू नये
  • प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य नाही
  • सुप्रिया पुराणिक यांनी वडिलधाऱ्या व्यक्तींना त्यांचे मत विचारले तेव्हा त्यांना या गोष्टी अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत असे उत्तर मिळाले. केस धुतल्यानंतर केसांचा त्वचा कोरडी होते आणि त्याचा परिणाम बाळावर होतो असेही सांगण्यात आले.

(वाचा :- 69 वर्षी रेखाच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, सौंदर्य व फिटनेसचे हे आहे रहस्य)

विज्ञानाच्या मते काय सत्य

विज्ञानाच्या मते काय सत्य

विज्ञानाच्या मते हे सर्व मिथक फक्त गोष्टीच आहे. या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नाही. गर्भपात आणि हेअर वॉशचा काहीही संबंध नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात किंवा गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसात किंवा गर्भधारणेमध्ये तुम्ही हेअर वॉश करु शकता.

(वाचा :- Cleaning Tips: मिक्सरच्या भांड्याचे डाग काढण्यासाठी ट्राय करा हे उपाय, काही मिनिटांत दिसेल नवे )

अस्वच्छ राहू नका

अस्वच्छ राहू नका

केस धुणं आणि गर्भपात होणं या गोष्टी खूप भिन्न आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्वच्छ राहू नका. केसांची स्वच्छता लक्षात घ्या. केसांचा तेलकटपणा निघून गेल्यास तुम्हाला ही फ्रेश वाटेल. त्यामुळे शरीराची स्वच्छता राखा.

हेही वाचा :  Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का

(वाचा :- या 4 सोप्या पद्धतींमुळे रक्त आतून होईल स्वच्छ, काचेसारखी चमकू लागेल त्वचा तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …