प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे?

गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात. ज्याचा परिणाम वेगवेगळा होत असतो. अनेक महिलांना प्रेग्नन्सीदरम्यान हात, पाय आणि स्तनांवर सूज येते. तुम्हीदेखील आई असाल तर याची अनुभूती तुम्हाला आलीच असेल. पण ही सूज नक्की काय येते याची कारणं अनेकांना माहीत नसतात. प्रेग्नन्सीदरम्यान सूज येण्याची अनेक कारणं आहेत आणि त्यातील एक कारण आहे एडिमा.

एडिमा म्हणजे नेमके काय? अशा परिस्थितीत गरोदर महिलेच्या शरीरात द्रव जमा होते आणि त्यामुळे नसा सुजतात. सूज शरीरातील कोणत्याही भागावर येऊ शकते. पण त्यासाठी आधी एडिमा म्हणजे काय जाणून घ्यायला हवे. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी याबाबत आम्हाला माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

एडिमा म्हणजे काय?

एडिमा म्हणजे काय?

Edema म्हणजे गरोदर महिलांच्या शरीरात सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रियेला मेडिकल टर्म देण्यात आली आहे. सामान्यतः शरीर सुजल्यानंतर त्याला एडिमा असं म्हणतात. एडिमामुळे शरीराचा कोणताही भाग सुजू शकतो अथवा संपूर्ण शरीरालाही सूज येऊ शकते. औषधं, गर्भावस्था, संक्रमण आणि कोणत्याही अन्य गोष्टींमुळे एडिमा होऊ शकतो.

हेही वाचा :  गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता

कधी आणि कसा होतो एडिमा?

कधी आणि कसा होतो एडिमा?

जेव्हा गरोदर महिलेच्या लहान रक्तवाहिन्यांजवळ तरल पदार्थ जमा होऊ लागतो तेव्हा एडिमा होतो. अतिरिक्त तरल पदार्त सेल्समध्ये सूज येण्याचे कारण ठरतात. शरीराच्या कोणत्याही भागावर सूज येणे हा त्याचा परिणाम आहे. किडनीचा आजार, थायरॉईड, कमकुवत लिव्हर, संधीवात, हातापायात दुखणे, वजन वाढणे अथवा उच्च रक्तदाब यापैकी काहीही एडिमाचे कारण ठरू शकते. याशिवाय रक्तात पदार्थांचे असंतुलन असल्यासही एडिमा होऊ शकतो.

(वाचा – एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? लक्षणं, कारणे आणि उपचार घ्या जाणून )

एडिमाचे प्रकार

एडिमाचे प्रकार
  • सेरेब्रल एडिमा – हे मेंदूला प्रभावित करते
  • पल्मोनरी एडिमा – हे फुफ्फुसांना प्रभावित करते
  • मॅक्युलर एडिमा – हे डोळ्यांवर प्रभाव पाडते

(वाचा – गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता)

प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या भागात येऊ शकते सूज

प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या भागात येऊ शकते सूज

रक्तप्रवाह अथवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे पायाला सूज येऊ शकते. याशिवाय शरीराचा वरचा भाग जड झाल्याने पायावर पूर्ण भार येतो त्यामुळेही पायाला सूज येते
प्रेग्नन्सीदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात, त्यामुळे चेहऱ्यावरही सूज येते, अनेक महिलांचा चेहरा या काळात सुजलेला दिसतो. मात्र अशावेळी घाबरण्याची अजिबात गरज नाही. हे सामान्य आहे
महिलांना ६ व्या अथवा ७ व्या महिन्यात हिरड्यांच्या सुजण्याचा त्रासही होऊ शकतो. शरीरीत वॉटर रिटेंशन आणि रक्ताचे प्रमाण वाढल्याने असे घडू शकते
गरोदरपणात अनेक महिलांना डोळ्यांखालीही सूज दिसून येते. पफीनेस निर्माण होतो. पूर्ण झोप न मिळाल्याने असे घडू शकते
बऱ्याच महिलांना स्तन अथवा निप्पल्सवरही सूज येण्याचा त्रास एडिमामुळे होतो. अशावेळी अनेक महिलांच्या स्तनांचा आकारही वाढतो आणि निप्पल्सचा आकारही वाढून सूज येते

हेही वाचा :  Rinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

(वाचा – C-Section सर्जरीतून लवकर जखम बरी व्हावी वाटत असेल तर बाळंतिणींनी या ५ सोप्या टिप्स करा फॉलो)

एडिमावर उपचार

एडिमावर उपचार
  • वजन संतुलित राखण्याचा प्रयत्न करा
  • जास्त वेळ उभे राहू नका अथवा चालू नका
  • नियमित व्यायाम करा
  • रोजचे थोडा वेळ चालणे, स्विमिंग यासारख्या व्यायामांना प्राधान्य द्या दिवसातून ३-४ वेळा पाय हळू उचलून पायांचा व्यायाम करा
  • पाय उशीवर ठेऊन झोपा

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …