C-Section ची जखम बरी होण्यासाठी बाळंतिणींनी या ५ सोप्या टिप्स करा फॉलो

नॉर्मल डिलिव्हरी असो अथवा सी-सेक्शन डिलिव्हरी बाळाला जन्म देण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मात्र काही काळच वेदना सहन करावी लागते. मात्र सिझर झाल्यास बाळाचा जन्म होताना तितका त्रास होत नाही. पण बाळंतिणीला त्यानंतर मात्र जखम भरेपर्यंत बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. जन्मभर पुरेल इतका त्रास सी-सेक्शननंतर अनेक महिलांना होतो.

सी-सेक्शननंतर महिलांना आपल्या आरोग्याची अत्यंत काळजी घ्यावी लागते. शरीरात येणारा कमकुवतपणा आणि त्यातून बरं होण्यासाठी काही खास टिप्सचा वापर करावा लागतो. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही तितकेच जपावे लागते. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी याबाबत काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुमची जखम लवकर बरी होऊन तुम्हाला कमी त्रास होऊ शकतो. जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

​अ‍ॅक्टिव्ह राहणे गरजेचे​

​अ‍ॅक्टिव्ह राहणे गरजेचे​

Cesarean Section Surgery Recovery: ब्लड क्लॉट्सपासून वाचण्यासाठी आणि आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी साधारणतः तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून थोडे थोडे अ‍ॅक्टिव्ह राहावे. सर्जरी झाल्यानंतर तुम्ही व्यायाम करू शकत नाही. मात्र पोटावर ताण येणार नाही अशा पद्धतीने थोडे थोडे चालावे. यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  पत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा

​हायड्रेटेड राहायला हवे​

​हायड्रेटेड राहायला हवे​

Stay Hydrated: सी सेक्शन डिलिव्हरीनंतर बरेचदा बाळंतिणीना बद्धकोष्ठतेचाही त्रास जाणवतो. अशावेळी पोटावर ताणही येतो. पोटावर ताण आल्यास जखमेवर ताण येतो. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला सतत पाणी नको असेल तर जेवणात काही गरम सुप्स अथवा हर्बल ड्रिंक्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या. कोणतेही ज्युस स्वतःच्या मनाने पिऊ नका.

(वाचा – Ovulation Period म्हणजे काय? आई होण्यापूर्वी जाणून घेणे का गरजेचे)

​जखम ठेवा स्वच्छ​

​जखम ठेवा स्वच्छ​

सी – सेक्शनची जखम तुम्हाला भरली आहे असं वाटत असली तरीही अनेक महिने ती आतून ओली असते. त्यामुळे नेहमी ही जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. प्रयत्न करा की, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ही जखम उघडी राहील आणि हवेच्या संपर्कात राहील. यासाठी काही महिने तुम्ही सैलसर आणि कॉटनचेच कपडे वापरा.

(वाचा – प्रेग्नन्सीदरम्यान जास्त तूप खाणे धोकादायक? किती प्रमाणात करावे सेवन)

​सपोर्टिंग उशीचा करा वापर​

​सपोर्टिंग उशीचा करा वापर​

Use Supporting Pillow: आपल्या लहान बाळाला स्तनपान करतानाही या जखमेवर ताण येतो. त्यामुळे बाळाला जेव्हा तुम्ही स्तनपानासाठी मांडीवर घ्याल तेव्हा सपोर्टिंग पिलो अथवा Lying Down Technique चा वापर करावा. ज्यामुळे तुम्हाला वाकावं लागणार नाही. यावेळी तुम्हाला अधिक प्रेशर वाटत असेल तर वेळीच Gynecologists’ कडे जाऊन तपासणी करून घ्या.

हेही वाचा :  VIDEO : कपड्यांमुळे तरुणीसोबत जमावाचं गैरवर्तन, असा वाचविला जीव...

(वाचा – Pregnancy Tips: प्रेग्नन्सीमध्ये भात खावा की खाऊ नये? सफेद की ब्राऊन कोणता भात ठरतो फायदेशीर)

​डॉक्टरांनी दिलेली औषधे चुकवू नका​

​डॉक्टरांनी दिलेली औषधे चुकवू नका​

सी-सेक्शन झाल्यानंतर बाळंतिणींना अत्यंत त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टर प्रत्येकीच्या शरीराच्यादृष्टीने योग्य अशी पेन किलर्स लिहून देतात. ही औषधे अजिबात चुकवू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी औषधे घ्यावी. जेणेकरून त्रास कमी होण्यास मदत मिळते.

सी सेक्शन सर्जरी ही अत्यंत त्रासदायक ठरते. यातून बरे होण्यासाठी किमान सहा महिने तरी लागतात. त्यामुळे आपली जखम बरी व्हावी यासाठी योग्य आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …