गर्भावस्थेदरम्यान पायाला सूज का येते? या घरगुती उपायांनी मिळवा आराम

आई होणं हा जगातील सर्वात भारी अनुभव आहे. पण वाटतं तितकं ते सोपं नाही. गर्भावस्थेदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो हे नक्की. हार्मोनल बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक समस्या मात्र प्रत्येकाला सहन कराव्याच लागतात. उलटी होणे, चक्कर येणे, डोके दुखणे, चेहऱ्यावर रॅश याशिवाय अनेक समस्या असतात. तर अनेक महिलांना वजन वाढीमुळे पाय सुजण्याची समस्या निर्माण होते. पण पायाला नक्की गर्भावस्थेदरम्या का सूज येते आणि त्यावर काय उपाय करावे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – @iStock)

​गर्भावस्थेदरम्यान पायाला सूज का येते?​

​गर्भावस्थेदरम्यान पायाला सूज का येते?​

विशेषज्ञानुसार, गर्भावस्थेदरम्यान पायांवर सूज येणे हे अत्यंत कॉमन आहे. ही समस्या बाळाच्या गरजेनुसार शरीरात तयार होणाऱ्या अतिरिक्त रक्त आणि लिक्विड पदार्थामुळे निर्माण होते. याला एडिमा असे म्हटले जाते. यामुळे केवळ पायांवर नाही तर हात, चेहरा आणि अन्य भागांवरही सूज येते. पायांवर सूज आल्याने बऱ्याच गरोदर महिलांना चालणेही कठीण होते. पायांवर जास्त ताण आल्यास ही सूज वाढते. ही समस्या बाळाच्या जन्मानंतर निघून जाते. पण यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता.

हेही वाचा :  Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...

​पायाखाली ठेवा उशी​

​पायाखाली ठेवा उशी​

गर्भावस्थेचा ९ महिने काळ हा मोठा असतो. साधारणतः ४ थ्या महिन्यानंतर पाय सुजण्याची समस्या अनेक गरोदर महिलांना जाणवते. जास्त काळ उभं राहिल्याने ही समस्या निर्माण होते. त्यामुळे तुम्ही पायाला आराम देण्यासाठी पायाखाली उशी ठेवा आणि पाय त्यावर ठेवा. साधारण २० मिनिट्स पाय ठेवा आणि झोपा. दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने तुम्ही हे करा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.

(वाचा – Pregnancy Tips: प्रेग्नन्सीमध्ये भात खावा की खाऊ नये? सफेद की ब्राऊन कोणता भात ठरतो फायदेशीर)

​एप्सम सॉल्ट पाण्यात पाय भिजवा​

​एप्सम सॉल्ट पाण्यात पाय भिजवा​

​तुमच्या पायावरही सूज असेल तर तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करावा. याच्या गुणांमुळे पायांवरील मांसपेशी मोकळ्या होतात आणि पायाच्या सुजेने होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळते. याच्यासाठी गरोदर महिलांनी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात एक चमचा एप्सम सॉल्ट मिक्स करा आणि या पाण्यात साधारणतः २०-२५ मिनिट्स पाय ठेवा. यामुळे पायाची सूज कमी होईल.

(वाचा – Preconception Check-Up म्हणजे काय, गरोदरपणाआधी केल्यास होतो फायदा)

​पोटॅशियमयुक्त आहाराचे सेवन करावे​

​पोटॅशियमयुक्त आहाराचे सेवन करावे​

गर्भावस्थेदरम्यान पोटॅशियमची कमतरता पायावर अधिक सूज आणू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाबाचा अथवा वॉटर रिटेंशनचा त्रासाचा धोका संभवतो. त्यासाठी डाएटमध्ये पॉटेशियमयुक्त जेवणाचा समावेश करावा. बटाटा, केळं, डाळिंब, पिस्ता, रताळे अशा पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ पायावरील सूज कमी करण्यास मदत करतात.

हेही वाचा :  'हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार' मुख्यमंत्री

(वाचा – गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी)

​हायड्रेटेड राहणे आवश्यक​

​हायड्रेटेड राहणे आवश्यक​

पायावरील सूज कमी करण्यासाठी गरोदर महिलांनी आपले शरीर हायड्रेटेड राखणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे. कमीत कमी दिवसाला ७-८ तास तरी पाणी पोटात जायला हवे. हे पायाची सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

​या गोष्टींची घ्या काळजी​

​या गोष्टींची घ्या काळजी​
  • प्रोटीनचे अधिक सेवन करा
  • गर्भावस्थेदरम्यान तुम्ही थोड्या थोड्या वेळाने फिरा आणि पाय मोकळे करा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज किमान २० मिनिट्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा
  • जेवणात मीठ कमी खा

टीप – ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात आली आहे. मात्र तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत घेऊन याचा वापर करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …