Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. या तिसऱ्या टप्प्यामध्ये देसभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. जिथं महाराष्ट्रात तुल्यबळ लढतींमुळं मतदान प्रक्रियेलाही विशेष महगत्त्वं प्राप्त झालं होतं तिथं देशातही चित्र वेगळं नव्हतं. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 65.5 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक मतदान करणाऱ्या राज्यांमध्ये 81.71 टक्क्यांसह आसाम आघाडीवर राहिलं तर, त्यामागोमाग पश्चिम बंगालमध्ये 76.52 टक्के मतदान झालं. टक्केवारीच्या बाबतीत महाराष्ट्रात एकूण आकडेवारी सुधारली असली तरीही ही 61.44 टक्के मतदान ही आकडेवारी समाधानकारक मानली जात आहे. 

बारामतीत मतदारांचा थंड प्रतिसाद  

महाराष्ट्रात बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 61.44 टक्के मतदान झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झाल्याचं स्पष्ट झालं. तर, बारामतीत मात्र मतदारांनी निवडणूक आणि मतदान प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.  वाढता उकाडा हे अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांपुढे उभं ठाकलेलं आव्हान ठरलं. तर, बारामती मतदारसंघात एकंदर सुरु असणारा वाद आणि उमेदवारांमध्ये असणारी लढत पाहता या कारणास्तव मतदारांचा हा थंड प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं गेलं. आता राज्यासह मुख्यत्वे बारामतीला मतदार नेमका कोणाला कौल देणार हेच पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

हेही वाचा :  VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद

राज्यातील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

बारामती – 56.07 टक्के
सोलापूर – 57.61 टक्के 
रायगड – 58.10 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  59.23 टक्के
लातूर – 60.18 टक्के 
उस्मानाबाद –  60.91 टक्के
सांगली – 60.95 टक्के
माढा – 62.17 टक्के
सातारा –  63.05 टक्के
हातकणंगले – 68.07 टक्के
कोल्हापूर –  70.35 टक्के



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा…’, Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

Controversy of Manusmriti movement in Mahad : जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब …

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी…; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.

Chhindwara 8 Family Members Murder: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात सामूहिक हत्याकांड घडल्याचा प्रकार समोर आला …