भारताचा माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड किडनीच्या आजारानं त्रस्त

Noel David Health Updated: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी सोमवारी भारताचा माजी क्रिकेट नोएल डेव्हिड यांची (Noel David) भेट घेतली. नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत.  त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मोहम्मद अजहरुद्दीन यांनी आश्वासन दिलं. “एचसीए केवळ नोएल डेव्हिडच्या आरोग्याची काळजी घेणार नाहीतर, त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्चदेखील उचलेल”, असं मोहम्मद अजहरुद्दीन म्हणाले आहेत.

भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळलेले नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत आहे. डेव्हिडवर या महिन्यात ज्युबली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. तसेच त्यांच्यात हळूहळू सुधारणा होत आहे, असं एचसीएच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय. आरोग्याच्या कारणास्तव आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळं डेव्हिड यांची भेट घेता आली नसल्याचंही निवेदनात म्हटलंय.

अजहरुद्दीन यांनी सोमवारी डॉक्टर सुब्रमण्यम यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रियेनंतर डेव्हिडच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर अजहरुद्दीननं अपोलो हॉस्पिटलचे सीओओ तेजस्वी राव यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च एचसीए उचलेल, असं आश्वासन दिलं. 51 वर्षीय नोएल डेव्हिड यांनी जुलै 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 

हेही वाचा :  टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …