असं काय घडलं? बायकोने नवऱ्याला चिमट्याने धुतलं अन् त्यानं पोलीस स्टेशन गाठलं!

Crime News : नवरा बायकोची भांडणं काही नवीन नसतात, कित्येवेळा काही साध्या साध्या कारणावरून हे भांडण इतकं टोकाला जातं की काही विचारू नका. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक नवरा-बायकोचं कशाना-कशावरून वाजतंच. अशातच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यावर त्या पतीने थेट पोलीस स्टेशन गाठत बायकोच मारत असल्याची तक्रार दाखल केली आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण? 
उत्तर प्रदेशमधील हमीरपूर इथल्या रथ नगरच्या पठाणपुरा भागातील ही घटना आहे. पती संजय आणि त्याची पत्नी कुसूम यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून भांडणं सुरू होती. भांडणाचं कारण म्हणजे या जोडप्याकडे असलेल्या असलेली कार, कुसूमला त्यांच्याजवळील असलेली कार विकून तिच्या आईला पैसे पाठवायचे होते. मात्र संजयने याला विरोध केला मग काय यावरूनच सर्व महाभारत घडलं. 

एक दिवस गाडी विकण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, पत्नी कुसूमने संजयला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीला गंभीर स्वरूप आलं, कुसुमने चिमटा गरम केला आणि पतीला मारहाण करण्यास सुरूवात करते. शेवटी तिचा पती पोलीस स्टेशन गाठतो. 

हेही वाचा :  Viral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...

पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तो कुसुमची तक्रार करतो. पोलिसही थोडावेळ हसतात, संजयने तक्रारीमध्ये, पत्नी माझा खूप छळ करते, मला या संकटातून बाहेर काढा, असं रडत रडत पोलिसांना सांगतो. पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेतली असून संजयने  पत्नी कुसुमवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र या तक्रारीची संपूर्ण पंचकृषीत मोठी चर्चा आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …