महिलांनी स्तनांची काळजी घेणे आवश्यक, स्तनाच्या कर्करोगासाठी सोनोमॅमोग्राफीचा देण्यात येतोय सल्ला, घ्या अधिक जाणून

अभिनेत्री छवी मित्तलने नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली आहे. भारतात महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळतो. त्या खालोखाल गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. नॅशनल सेंटर फ़र डिसीझ इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम अहवालानुसार २०२० मध्ये भारतातील महिला कर्करुग्णांपैकी ३९.२% महिलांना स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होता. उपलब्ध संशोधनानुसार, रेडिएशन, अमली पदार्थांचे सेवन, वाढते वय, स्थूलपणा, मद्यसेवन, अनुवंशिकता इत्यादी घटक स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत होते. यासाठी स्तनांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला सोनोमॅमोग्राफी करण्याचाही सल्ला देऊ शकतात. डॉ. सुनिता दुबे, प्रख्यात रेडियोलॉजिस्ट आणि संस्थापक, मेडस्केपइंडिया यांनी माहिती दिली आहे. (फोटो क्रेडिटः Freepik.com, @chhavihussein Instagram)

स्तनांच्या कर्करोगात वाढ

२०२० मध्ये भारतातील अंदाजे दोन लाख महिलांना स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, या अंदाजानुसार ७६,००० महिलांचा मृत्यू झाला. २०२० च्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम रिपोर्टनुसार २०२५ पर्यंत हा आकडा २ लाख ३० हजारावर जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही भयावह आकडेवारी लक्षात घेता, स्तनांची अत्यंत काळजी घेणे महिलांना अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्तनांची स्वतःहून नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरच्या सल्ल्याने मॅमोग्राफी करावी. पण हल्ली डॉक्टर सोनोमॅमोग्राफी करण्याचाही सल्ला देतात.

हेही वाचा :  तुमच्या 'या' सवयी देतात कॅन्सरला आमंत्रण, या ६ कॅन्सरमुळे जगात सर्वाधिक मृत्यू, WHO ने सांगितलेले उपाय पाहा

सोनोमॅमोग्राफी म्हणजे काय?

What is Sonomammography: सोनोमॅमोग्राफी किंवा स्तनांची अल्ट्रासाउंड तपासणी ही छेद न देता (नॉन-इन्व्हेजिव्ह) करण्याचे तंत्र आहे. या प्रक्रियेने स्तनांची तपासणी आणि स्तनांच्या आत होणाऱ्य रक्तप्रवाहाची तपासणी करता येते. स्तनांचा कर्करोग आणि स्तनांमध्ये असलेल्या विकृतीची तपासणीही या तंत्राने करता येते. या चाचणीच्या माध्यमातून स्तनांमधील गाठ किंवा गोळा समजू शकते. सोनोमॅमोग्राफी ही प्रभावी चाचणी आहे आणि सामान्य नसलेली गाठ असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही तत्काळ फाइन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी (एफएनएसी) चाचणी करू शकता.

Sonomammography कोणी करावी?

sonomammography-

Who Should Do Sonomammography: स्तनांमध्ये गाठ आढळली किंवा मांसल गोळा झाल्याचे जाणवले, स्तनांमधील ऊती खूप दाट असल्याचे जाणवले, स्तनांचा कर्करोगाची कुटुंबात पार्श्वभूमी असेल आणि स्तनांमध्ये सामान्य नसणारे बदल आढळले तर ही चाचणी करावी.(वाचा – स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळणे शक्य)

Sonomammography कशी करावी?

sonomammography-

How To Do Sonomammography: सोनोमॅमोग्राफी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कधीही करता येते. त्यासाठी खास तयारी करावी लागत नाही. या चाचणीमध्ये ती व्यक्ती चाचणी करण्याच्या टेबलवर आडवी होते. रेडियोलॉजिस्ट तिच्या स्तनांच्या भागात जेल लावते आणि खास प्रोबने (लिनिअर, हाय फ्रिक्वेन्सी प्रोब) स्तनांचा पूर्ण भाग आणि काखेच्या भागाची तपासणी करून गाठ आहे का याची चाचपणी केली जाते.

हेही वाचा :  कर्करोग समूळ नष्ट करण्यासाठी महिलांनी तपासणीकडे दुर्लक्ष करू नये, ठरेल घातक

(वाचा – Breast Cancer Causes | स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?)

सोनोमॅमोग्राफीचे फायदे

Benefits of Sonomammography: ही चाचणी पटकन होते, वेदनारहीत असते, सहज उपलब्ध असते आणि नॉन-इन्व्हेजिव्ह असते. या चाचणीने स्तनांच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते. ही चाचणी खर्चिक नाही, यासाठी पूर्वतयारीची आवश्यकतना नसते आणि स्तनांमध्ये विकृती असलेल्या महिलांसाठी हे महत्त्वाचे साधन आहे.

स्तनांमध्ये गाठ असेल तर नियमित तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्यावा. निदान लवकर झाले तर जीव वाचू शकतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक कराmaharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …