‘पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर’, निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा दावा

Sajal Ali: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही सध्या तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा (Adil Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की,  पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर करतात. आदिल राजा यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly)  प्रतिक्रिया दिली आहे. 

सजल अलीचं ट्वीट
सजल अलीनं ट्वीटच्या माध्यमातून  निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘आपला देश नैतिकदृष्ट्या कुरूप होत चालला आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. चारित्र्य हत्या हा पापाचा सर्वात वाईट प्रकार आहे.’  

live reels News Reels

आदिल राजा हे यूट्युबर आहेत. त्यांचं ‘सोलजर स्पिक्स’ (Soldier Speaks) या नावाचं एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलला 290,000 युझर्सनं सबस्क्राइब केलं आहे. आदिल राजा हे वेगवेगळे व्लॉग्स शेअर करतात. पाकिस्तानी अभिनेत्रींच्या संबंधित केलेल्या दाव्यामध्ये आदिल राजा यांनी कोणत्याही अभिनेत्रींचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त अभिनेत्रींच्या नावामधील लेटर्सचा वापर केला. MK, MH, KK, and SA या लेटर्सचा वापर त्यांनी केला होता. यामधील  SA हे नाव सजल अलीचं आहे, असं काहींचं मत होते. या सर्व प्रकरणावर  सजल अलीनं रिप्लाय देऊ प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा :  बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये

कोण आहे सजल अली? 

सजल अली ही पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2009  मधील नादानियां या मालिकेमधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  श्रीदेवी यांच्या मॉम या हिंदी चित्रपटामध्ये सजलनं काम केलं. जिंदगी कितनी हसीन है, खेल खेल मै या चित्रपटांमध्ये सजलनं काम केलं. मेरी लाडली, ये दिल मेरा, कुछ अनकही या मालिकेमध्ये सजलनं काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 3 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …