चहा किंवा कॉफीने नाही तर दिवसाची सुरूवात करा या पदार्थांनी, ऋजुता दिवेकरने सांगितलं यामागचं कारण

अनेकांच्या दिवस उजाडला की, पहिला डोक्यात येणारा विचार म्हणजे चहा की कॉफी. दिवसाची सुरूवात जर तुम्ही या दोन पेयांनी करत असाल तर सावध व्हा. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने याबाबत खूप मोठा समज दूर केला आहे. चहा आणि कॉफी ही दोन्ही पेय मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत.

ऋजुता दिवेकर म्हणते की, प्रत्येकाने त्याच्या दिवसाची सुरूवात ही अतिशय हेल्दी करणे गरजेचे आहे. कधीच तुम्ही चहा किंवा कॉफीची मदत घेऊ नका. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत ऋजुता दिवेकरने दिवसाची सुरूवात नेमकं काय करून करावी हे सांगितलं आहे. (फोटो सौजन्य – rujuta.diwekar इंस्टाग्राम / iStock)

ऋजुता दिवेकर इंस्टाग्राम व्हिडीओ

​अशी करा दिवसाची सुरूवात

ऋजुता सकाळी उठल्यावर केळी, भिजवलेले बदाम आणि मनुका खाण्याचा सल्ला देते. अगदी उठल्यावर २० मिनिटाच्या आत हे पदार्थ शरीरात जाणे आवश्यक असल्याचं ऋजुता सांगते.

(वाचा – फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss))

हेही वाचा :  Crime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं

​केळ का खावे?

ज्यांना पचनाची समस्या आहे किंवा जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते त्या सगळ्यांनी केळ्याचे सेवन करावे. तसेच या पदार्थांसोबत हंगामी फळे आठवड्यातून २-३ वेळा खावीत. बाजारात जाऊन ही फळे आणताना प्लॅस्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा.

(वाचा – Diabetes Tips : डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी))

​६-७ भिजवलेले मनुके

तुम्हाला पीएमएस म्हणजे मासिकपाळी पूर्वीचा काही त्रास जाणवत असेल किंवा दिवसभर शरीरात कमी ऊर्जा वाटत असेल, खूप थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही दिवसाची सुरूवात ही चहा किंवा कॉफीने न करता भिजवलेल्या मनुक्यांनी करावी. तसेच या मिश्रणात मासिक पाळी पूर्वी १ ते २ केशरच्या काड्या घालून ते देखील घेऊ शकता.

(वाचा – Weight Loss Home Remedy : स्वयंपाकघरातील या ६ गोष्टी खऱ्या Fat Burner, खाताच बर्फासारखी वितळेल चरबी)

​४-५ भिजवलेले बदाम

तुमची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, मधुमेह, PCOD किंवा कमी प्रजनन क्षमता किंवा खराब झोप गुणवत्ता असल्यास मनुके हे रामबाण उपाय ठरू शकतात. स्थानिक बदामाची निवड करा असं देखील ऋजुता सांगते.

(वाचा – Foods to Control High BP: सायलेंट किलर असलेल्या हाय बीपीला घरगुती उपायांनी करा कंट्रोल)

हेही वाचा :  What to Avoid After Coffee : कॉफीनंतर ही ८ औषधे कटाक्षाने टाळा, नाहीतर डोक्यावर राहिल मृत्यूची टांगती तलवार

​काय काळजी घ्याल

  • या पदार्थांनंतर 10-15 मिनिटे चहा किंवा कॉफी घेणे ठीक आहे
  • एक ग्लास (फक्त) साधे पाणी घ्या आणि नंतर हे जेवण घ्या
  • उठल्यानंतर किंवा थायरॉईड गोळी घेतल्यानंतर 20 मिनिटांत हे खा
  • या जेवणानंतर १५-२० मिनिटे तुम्ही कसरत/योगा इत्यादी करू शकता
  • जर वर्कआउट करत नसाल तर हे पदार्थ खाण्याच्या तासाभरात तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता
  • तुम्ही मनुका भिजवलेले पाणी पिऊ शकता

(वाचा – हिवाळ्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने भारतात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या))

​FAQ – प्रश्नोत्तरे

faq-

प्रश्न- मला केळी आवडत नाही, मी काय करावे?

उत्तर – सध्या हंगामात असलेले कोणतेही प्रादेशिक, स्थानिक फळ निवडा.

प्रश्न – मला हे तिन्ही पदार्थ खायला आवडत नाही मी काय करू?

उत्तर – सकाळची सुरूवात अगदी या तीन पदार्थांनीच करा. पण तुम्ही आज केळ, उद्या मनुके आणि परवा बदाम असा खेळ खेळूनही हे पदार्थ खाऊ शकता. हे पदार्थ शरीरात जाणे गरजेचे आहे.

(वाचा – अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?))

हेही वाचा :  सप्लिमेंट्सचा शरीराच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम? खरंच Supplements गरज आहे का

FAQ

faq

प्रश्न – जर मला PCOD असेल तर मी नक्की काय खावे?

उत्तर – भिजवलेले बदाम आणि नंतर मासिक पाळीपूर्वी 10 दिवस भिजवलेल्या मनुका आणि केसरवर स्विच करा. तुम्ही मासिक पाळीच्या तारखेचा अंदाज लावू शकत नसल्यास, जेव्हा तुम्हाला पोट फुगल्यासारखे जाणवेल किंवा चिडचिड वाटू लागते तेव्हा हा आहार स्विच करा. हे एंडोमेट्रिओसिस आणि एडेनोमायोसिससाठी देखील केले जाऊ शकते.

प्रश्न – आपण बदाम का भिजवतो?

उत्तर – त्यातून पोषक तत्वे अनलॉक करण्यासाठी आणि फायटिक ऍसिडची पातळी खाली जाण्यासाठी.

(मकर संक्रांतीकरता असे तयार करा तिळाचे लाडू, रक्तातील LDL कोलेस्ट्रॉलला कंट्रोल राहून होतील ५ जबरदस्त फायदे))Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …