Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळजी

Smartphone care : मोबाईल फोनवर व्हिडीओ पाहताना स्फोट झाल्यामुळे आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच केरळच्या त्रिशूर येथे घडली. त्यामुळे आपल्या सोबत कायम असणाऱ्या आपल्या स्मार्टफोनचा अतिवापर हा जीवघेणा ठरु शकतो हे पुन्हा एकदा समोर आलं. दरम्यान अशाप्रकारे फोनचा स्फोट होण्यास नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात तसंच अशाप्रकारचा स्फोट टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. कारण स्मार्टफोन हे कितीही प्रीमियम असले तरी त्यांची बॅटरी विस्फोट होण्यास संवेदनाक्षम असते. वनप्लस फोन्सचा स्फोट, सॅमसंगच्या काही मॉडेल्समध्येही या घटना समोर आल्या आहेत, तर अशाप्रकारच्या घटना का होतात आणि त्या टाळण्यासाठी आपण कोणती काळजी घेऊ शकतो, ते जाणून घेऊ…

​​1. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट

1-

आता हे कारण म्हणजे नेमकं काय हे त्याच्या नावातच आलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणजेच फोन उत्पादनातील दोष.फोनचा स्फोट होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. हँडसेटला पॉवर देणारी लिथियम-आयन बॅटरी फोनमध्ये फिट करण्यापूर्वी तिची योग्यरित्या चाचणी करणं आवश्यक आहे. चुकीचा घटक किंवा असेंबली लाईनमधील बिघाडामुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि परिणामी फोनचा स्फोट होऊ शकतो. हे सहसा घडते जेव्हा बॅटरीमधील सेल्स अधिक तापमानापर्यंत पोहोचतात (बाह्य उष्णता, जास्त चार्जिंग, नुकसान किंवा खराब उत्पादनामुळे सेल्सचं तापमान वाढतं. तसंच स्वस्त बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते.

वाचा :Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

2. बॅटरीचे फिजीकल नुकसान

2-

फोनचा स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे बॅटरीची फिजीकल स्थिती. काही वेळा फोन पडतो, आपटला जातो, त्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. हे बॅटरीच्या अंतर्गत यांत्रिक किंवा रासायनिक संरचनेत बदल करू शकते – ज्यामुळे शॉर्ट-सर्किट,फोन जास्त गरम होणे आणि बरेच काही होऊ शकते. एकदा बॅटरी खराब झाल्यानंतर, ती अनेकदा फुगते.ज्यानंतर बॅटरी बदलून नवीन बॅटरी खरेदी करणंच अधिक चांगलं आहे. आजकालच्या मॉडेलमध्ये बॅटरी वेगळी काढता येत नसली तरी तुम्ही स्मार्टफोनच्या मागील पॅनेलकडे लक्षपूर्वक पाहून सांगू शकता, जर फोन अधिक जाड वाटत असेल तर समजा बॅटरी खराब झाली आहे.

हेही वाचा :  सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी...; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

3. दुसरा किंवा लोकल कंपनीचा चार्जर वापरणे

3-

ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. प्रोप्रायटरच्या चार्जरशिवाय फोन चार्ज करणं धोकादायक असू शकते. थर्ड-पार्टी चार्जर्समध्ये हँडसेटला आवश्यक असलेल्या फीचर्सची कमतरता असते. ते सारखे दिसत असले तरी ते चूकीच्याप्रकारे चार्ज करुन फोन जास्त गरम करू शकतात, फोनच्या आतील घटक खराब करू शकतात आणि तुमच्या फोनच्या बॅटरीला खराह करु शकतात. ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आणखी वाढते.

वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

4. रात्रभर चार्जिंग करणे

4-

बॅटरी खराब होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अधिकवेळ म्हणजेच रात्रभर चार्जिंग करणं. आपल्यापैकी बहुतेक जण झोपायला जाताना फोन चार्जिंगवर ठेवतात. ज्यामुळे सकाळपर्यंत फोन फुल चार्ज होऊ शकतो. पण याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो कारण ती जास्त चार्ज केल्याने जास्त गरम होणे, ओव्हरचार्जिंग, शॉर्ट सर्किट आणि काही वेळा स्फोट देखील होऊ शकतो. अनेक स्मार्टफोन्स आता एका चिपसह येतात जी बॅटरीची पातळी 100 टक्के असताना विद्युत प्रवाह थांबवते. पण अजूनही काही मुठभर परवडणारे हँडसेट आहेत ज्यात हे फीचर नाही आणि म्हणूनच युजर्स रात्रभर फोन चार्जला लावून फोनचा स्फोट करु शकतात.

हेही वाचा :  ​PDF File डाउनलोड करताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर फोन होईल हॅक आणि खातं होईल रिकामं

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

5. प्रोसेसर ओव्हरलोड

5-

प्रोसेसरमुळे देखील तुमचा फोन अधिक गरम होऊ शकतो. PUBG सारख्या भारी ग्राफिक्ससह येणारे गेम खेळून किंवा मल्टी-टास्किंग यामुळे प्रोसेसरवर खूप लोड येतो. दरम्यान प्रोसेसरवर लोड वाढला की आपोआपच फोन तापतो म्हणजेच बॅटरीही तापते आणि यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो. आजकाल हँडसेटची उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी थर्मल लॉक फीचर किंवा थर्मल पेस्ट जोडणे अनेक कंपन्यांनी सुरू केले आहे. परंतु बऱ्याच मॉडेल्समध्ये हे फीचर नसल्याने तसंच कधी कधी थर्मल लॉक निकामी झाल्याने फोन तापू शकतो. त्यामुळे अधिक हेवी काम करताना थोडी विश्रांती फोनला देणं गरजेचं आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

6. फोनवर थेट सूर्यप्रकाश पडणं, कारमध्ये फोन तापणं

6-

जास्त उष्णता फोनची बॅटरी खराब करू शकते. बॅटरीच्या सेल्स अधिक उष्णतेमुळे खराब होतात. सेल्स खराब झाल्यावर एक्झोथर्मिक ब्रेकडाउन गमावतात आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारखे वायू तयार करतात. या वायूंमुळे बॅटरी फुगू शकते आणि शेवटी स्फोट होऊ शकतो. म्हणून, उष्ण कारमध्ये तसंच कोणत्याही उष्ण ठिकाणी हँडसेट न ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि दीर्घकाळापर्यंत थेट सूर्यप्रकाशात देखील फोन ठेवू नये.

वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​7. पाण्याच्या संपर्कात येणारी बॅटरी

7-

हँडसेट वॉटरप्रूफ नसताना पाण्यामुळे बॅटरी फुटत होती. आजकाल सर्वात परवडणारे हँडसेट देखील कमीत कमी स्प्लॅश-प्रतिरोधक कोटिंगसह येतात जे पाणी शक्य तितके बॅटरीपासून लांब ठेवते. त्यामुळे आता फोन पाण्याच्या संपर्कात येऊन बॅटरी खराब होणे आणि परिणामी फुटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण तरीही अधिक पाण्याच्या ठिकाणापासून फोनची खासकरुन फोनच्या बॅटरीची काळजीघेणं गरजेचं आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा​

हेही वाचा :  सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

8. युजर्समुळे झालेल्या नुकसानामुळे फोन फुटणे

8-

युजर्सच्या चुकीमुळे झालेल्या नुकसानामुळे स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मागील वर्षी अशाच एका स्मार्टफोनचा स्फोट युजर मोटारसायकल चालवताना झाला होता. पण कंपनीने नीट चेंकिंग केल्यावरफोनवर बाहेरुन दबाव आल्याने ही घटना घडली होती. त्यामुळे युजर्सनी देखील फोन वापरताना त्यावर अधिक लोड किंवा बाहेरुन बॅटरीवर कोणता दबाव येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

वाचा :फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार, Aitel Jio आणि Vi चा AI बेस्ड नवा प्लान​

फोन स्फोट टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

फोन स्फोट टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुमची बॅटरी खराब झाली आहे आणि स्फोट होऊ शकतो हे कळण्यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्ही चेक करु शकता. जसंकी फोनच्या बॅकपॅनलचा आकार अधिक जाड होण, पॉपिंग येणं. या व्यतिरिक्त, तुम्ही फर्स्ट-पार्टी चार्जर वापरत आहात का नाही हे देखील पाहावं. फोन पाण्यापासून दूर ठेवत आहात याचीही खात्री करा, फोन खूप गरम असताना चार्ज करू नका. तसंच लक्षात ठेवा चार्जिंग दरम्यान फोनमध्ये जड काम करू नका. चार्जिंगच्या वेळी चित्रपट पाहणे आणि जास्त वेळ गेम खेळणे घातक ठरू शकते आणि तुमच्या बॅटरीचे तापमान वाढू शकते.

फोन नेहमी सोबत आलेल्या मूळ चार्जरने चार्ज करणे महत्त्वाचे आहे. इतर कोणत्याही किंवा स्थानिक चार्जरने फोन चार्ज करणे देखील धोकादायक असू शकते. शक्य असल्यास ते टाळा.

​वाचाःGaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Megablock: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती …

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …