यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत

weather updates : इथं हिवाळा सुरु असूनही राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाही आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांपुढं आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मान्सूनच्या दिवसांमध्ये सरासरीहून कमी पर्जन्यमान असल्यामुळं दुबार पेरणीचं संकट आणि त्यानंतर शेतात बहरलेल्या पिकावर अवकाळीचं सावट असं संकट चारही बाजूंनी संकट ओढावल्यामुळं बदलत्या हवामानाचा सर्वाधित फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हवामान बदलाचं हे सत्र इतक्यावरच थांबणार नसून नव्या वर्षातही परिस्थिती फारशी बदलणार नाहीये. 

मार्च महिन्यापर्यंत पाऊस? 

हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागात सरासरीहून 112 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  या अवकाळी पावसाचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. 

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरामध्ये सरासरीच्या 69.7 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र हे प्रमाण 112 टक्क्यांवर पोहोचू शकतं. हिवाळ्यात डिसेंबरअखेर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिलं, येत्या काळात हीच परिस्थिती कायम राहिली तर,  पुढील महिन्याभरातही किमान तापमान सरासरीहून जास्त राहू शकतं. त्यामुळं हिवाळा जवळपास काढता पाय घेण्याच्या मार्गावर दिसू लागला आहे. 

हेही वाचा :  Government Jobs : राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

अल निनोचा परिणाम? 

पॅसिफिक महासारहामध्ये निर्माण झालेली अल निनोची स्थिती मार्च महिन्याच्या शेवटापर्यंत कायम राहणार असून, त्याचे दूरगामी परिणामही देशावर पाहायला मिळणार आहेत. अल निनोमुळं एकूण तापमानात सातत्यपूर्ण वाढ दिसेल. उपलब्ध आकडेवारीनुसार 2023 या संपूर्ण वर्षभरात भारताच्या तापमानात 0.65 अंशांची वाढ नोंदवली केली. याआधी 2016 मध्ये तापमानात 0.71 अंशांची वाढ पाहायला मिळाली होती. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …