SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

नवी दिल्ली :How to Clean Smartphone screen : बटणांच्या फोनचं युग जाऊन आता फक्त आणि फक्त स्क्रीनटच फोनच आपल्यला दिसतात. आधी किमान तीन बटणं तरी फोनला होती पण आतातर पूर्णपणे स्क्रीनच असते. अशामध्ये मोबाईलमध्ये स्क्रीनचं महत्त्व कमालीचं वाढल्याने स्क्रीनची काळजी घ्यावी लागते. त्यात अनेकजण आजकाल महागडे फोन घेतात, ज्यांचा डिस्प्ले तितकाच भारी असतो. त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यात स्मार्टफोनच्या स्क्रीनची काळजी घेतली नाही तर त्यावर बसलेली धूळ ही स्क्रीनच्या आत जाऊन डिस्प्ले देखील खराब करु शकते. तर अशामध्ये आता तुम्हालाही तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला साफ ठेवायचं असेल तर काही सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

खाण्याच्या तेलाने करु शकता साफ

कधी-कधी आपल्या फोनचं स्क्रीनगार्ड तुटतं मग आपण ते काढून टाकतो. पण त्या स्क्रीनगार्डचा ग्लू तिथेच राहतो. त्याचा निशाणही तसाच राहतो. पण अशामध्ये जर तुम्ही खाण्याच्या तेलात कपडा टाकून त्याने स्क्रीन पुसून घेतली तर तो ग्लू राहणार नाही आणि त्यामुळे फोनची स्क्रीन पुन्हा चमकेल.

टूथपेस्टने करु शकता साफ
मोबाईल स्क्रीन चमकवण्यासाठी टूथपेस्टचा वापरही करु शकता. टूथपेस्टच्या वापराने स्क्रीनवरील दाग आणि इतर स्क्रॅचेस हटवले जाऊ शकतात. तर टुथपेस्टने साफ करताना तुम्हाला एका कापसाच्या बोळ्यावर थोडीशी टुथपेस्ट लावयची आहे. त्यानंतर तुमची स्क्रीन हळुवारपणे पुसून घ्या. स्क्रीनवरील दाग किंवा स्क्रॅचेस साफ होईपर्यंत पुसून अखेर एखाद्या वेट वाईपने स्क्रीन पुसू शकता.

हेही वाचा :  Redmi 10, Realme Narzo 50A आणि Samsung Galaxy M21 मध्ये कोणता बजेट फोन चांगला असेल, जाणून घ्या | redmi 10 vs realme narzo 50a vs samsung galaxy m21 which smartphone is best for you know price features and specifications prp 93

वेट वाईप किंवा लिक्विड स्प्रेही आहे साफ करण्यासाठी बेस्ट
आजकाल आपण स्क्रीनगार्ड लावायला गेलो की तेथील दुकानदार वेट वाईप किंवा लिक्विड स्प्रेने स्क्रीन साफ करतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टीतर स्क्रीन साफ करण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमतही अधिक नसून साफ करणंही सोपं आहे. त्यामुळे या सोप्या स्टेप्स वापरुन तुम्ही तुमची स्क्रीन अगदी नव्या सारखी चमकवू शकता.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …