तुमच्या ‘या’ सवयी देतात कॅन्सरला आमंत्रण, या ६ कॅन्सरमुळे जगात सर्वाधिक मृत्यू, WHO ने सांगितलेले उपाय पाहा

Bad Habits That Cause Cancer : राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस (National Cancer Awareness Day) दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार याविषयी लोकांना माहिती देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा या दिवसाची घोषणा केली होती. कॅन्सरच्या उपचारासाठी रेडिओथेरपी विकसित करणाऱ्या मेरी क्युरीच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.

आज आपण जगात ज्या ६ कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यू होतो. त्या कॅन्सरची माहिती पाहणार आहोत. एवढंच नव्हे तर त्या कॅन्सरपासून बचाव करणारे उपाय देखील बघणार आहोत. महत्वाचं म्हणजे जागितक आरोग्य संघटना असलेल्या WHO ने याबाबत माहिती दिली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2020 मध्ये सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू किंवा सुमारे 10 दशलक्ष मृत्यू फक्त कर्करोगामुळे झालेत.. ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer), आतड्याचा कर्करोग (Colon Cancer), गुदाशयाचा कर्करोग (Rectum Cancer), पोटाचा कर्करोग (Stomach Cancer)आणि यकृताचा कर्करोग (Liver Cancer) या कर्करोगांची लागण सर्वाधिक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

याशिवाय प्रोस्टेट कॅन्सरचाही समावेश त्वचेच्या कर्करोगाच्या प्रकारात होतो. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  ही 5 लक्षणं ओरडून सांगतात झाली आहे कॅन्सरची सुरूवात, Stage 1 आधीच करा ही 7 कामे, वाचेल जीव

​WHO ने सांगितलेले ६ कर्करोग

who-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2020 मध्ये सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू किंवा सुमारे 10 दशलक्ष मृत्यू फक्त कर्करोगामुळे झालेत.. ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer), आतड्याचा कर्करोग (Colon Cancer), गुदाशयाचा कर्करोग (Rectum Cancer), पोटाचा कर्करोग (Stomach Cancer)आणि यकृताचा कर्करोग (Liver Cancer) या कर्करोगांची लागण सर्वाधिक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय प्रोस्टेट कॅन्सरचाही समावेश त्वचेच्या कर्करोगाच्या प्रकारात होतो.

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू टाळा

मेयो क्लिनिकच्या मते, तंबाखूचा कोणत्याही प्रकारचा वापर तुम्हाला कर्करोगाचा रुग्ण बनवू शकतो. धुम्रपान हे फुफ्फुस, तोंड, घसा, स्वादुपिंड, मूत्राशय, गर्भाशय ग्रीवा आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगासह – विविध कर्करोगांशी जोडलेले आहे. त्याच वेळी, तंबाखू चघळण्याचा संबंध तोंडी पोकळी आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी जोडला गेला आहे. सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आल्यानेही तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

हेही वाचा :  World Cancer Day 2023: महिलांनी कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आहेत कॅन्सरचे जीवघेणे प्रकार

(वाचा – पॅडेड ब्रा किंवा रात्री ब्रा घातल्यामुळे Breast Cancer चा धोका वाढतोय? डॉक्टरांनी दिलेलं उत्तर महत्वाचं)

​निरोगी आहारामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो

निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, वनस्पती-आधारित म्हणजेच प्लान्ट बेस फूडचे सेवन आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. असे अन्न पर्याय निवडा जे निरोगी वजन राखण्यास मदत करतात. याशिवाय, प्रक्रिया केलेले अन्न किंवा मांसाहाराचे प्रमाण कमी करा. कारण ते कर्करोगाचा धोका वाढवण्याचे काम करते.

(वाचा – Weight Loss Real Story : अभिनेत्रीने Diet आणि Excercise सोबतच न चुकता एक कप ‘हा’ पदार्थ घेऊन ३० किलो वजन केलं कमी)

​नियमित व्यायामामुळे कर्करोग दूर राहतो

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, नियमित शारीरिक हालचालींमुळे स्तन, प्रोस्टेट, कोलन, एंडोमेट्रियम आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

(वाचा – शहरातील हवा पुरूषांना बनवतेय नपुसंक, फक्त एवढेच दिवस जिवंत राहतात Sperm)

​लसीकरण करा

एचपीव्ही लस अनेक प्रकारचे कर्करोग टाळू शकते. याव्यतिरिक्त, हिपॅटायटीस बी लस यकृताचा कर्करोग टाळण्यास मदत करू शकते.

(वाचा – मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू)

हेही वाचा :  Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; 'या' दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

​नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक

त्वचा, कोलन, गर्भाशय ग्रीवा आणि स्तन यासारख्या कर्करोगाच्या विविध प्रकारांसाठी नियमित स्व-तपासणी आणि स्क्रीनिंग – लवकर ओळखण्याची शक्यता वाढवू शकतात. त्यामुळे कर्करोग बरा होण्याची शक्यताही अनेक पटींनी वाढते. त्यामुळे आपल्याच शरीराकडे मोकळेपणाने आणि डोळसपणे पाहा. महिन्याला वैद्यकीय तपासणी महत्वाची ठरेल याचा विचार करा.

(वाचा – Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …