मुळापासून संपतात Cancer च्या 65% घातक-जीवघेण्या पेशी, जीवनदान ठरतोय हा ग्रीन ज्यूस

कॅन्सर (Cancer) हा एक गंभीर आजार आहे जो अनियंत्रित DNA पेशींच्या वाढीमुळे होतो. यामुळे शरीराच्या कार्यात बाधा उत्पन्न होते. कॅन्सरची लक्षणे दिसून सुद्धा जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी सुरुवातीच्याच स्टेजमध्ये कॅन्सरची ओळख होणे खूप गरजेचे असते. कारण यामुळे त्यावर वेळीच उपचार करून कॅन्सरमुक्त होता येते. पण तुम्हाला माहित आहे का की काही कॅन्सरचे प्रकार हे एवढे सामान्य लक्षणे दाखवतात की अगदी शेवटच्या स्टेजला कॅन्सर कळतो आणि अशा स्थितीत हातात काहीच उरत नाही.

तर मंडळी, म्हणूनच कॅन्सर हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो व यापासून बचाव करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर आहे हे देखील तुम्हाला माहित असायला हवे. काही संशोधनामधून हे दिसून आले आहे की व्हीटग्रास (Wheatgrass) ज्याला गव्हांकुर किंवा गव्हाचं रोप असेही म्हणतात त्यांचे सेवन केल्याने ब्लड कॅन्सरमधील खराब पेशी काहीच दिवसांत 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.

कॅन्सरची सामान्य लक्षणे

कॅन्सरबाबत योग्य ती जागरुकता निर्माण झाली नसल्याने आज सुद्धा लोकांना कॅन्सरबाबत अनेक गोष्टी माहित नाहीत. एवढेच काय तर कॅन्सरची सामान्य लक्षणे काय आहेत हे देखील अनेकांना माहित नाहीत. ती जरी माहित असती तरी वेळीच कॅन्सर ओळखून कित्येक जीव वाचले असते. चला आज कॅन्सरची सामान्य लक्षणे जाणून घेऊया.

  1. लघवी आणि संडासच्या सवयींमध्ये बदल होणे
  2. जखम वेळीच ठीक न होणे
  3. ब्लीडींग वा डिस्चार्ज
  4. गाठ तयार होणे
  5. अपचन होणे वा गिळताना त्रास होणे
  6. तीळ किंवा चामकिळाचा रंग आणि आकार बदलणे
  7. सतत खोकला येणे आणि मुख्य म्हणजे आवाज बसणे होय.
हेही वाचा :  कोणत्या लेन्सचा स्मार्टफोन खरेदी करायला हवा?, जाणून घ्या डिटेल्स

(वाचा :- Anti Aging: 10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण, वय कमी करण्यासाठी डॉक्टरचा अनोखा उपाय)

कॅन्सरवर झाले संशोधन

NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, व्हीटग्रासच्या संपर्कात आल्यावर अनुक्रमे 24, 48 आणि 72 तासांसाठी ल्यूकेमिया पेशींच्या नष्ट होण्यात अजून वाढ झाली आणि मुख्य म्हणजे ही वाढ तब्बल 65 टक्क्यांपर्यंत होती. हाच निष्कर्ष पाहून शास्त्रज्ञांनी सांगितले की कॅन्सर पासून बचाव करण्यात आणि त्यावर उपचार करण्यात व्हीटग्रास फायद्याचे ठरू शकते. हे संशोधन येणाऱ्या काळासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे आणि जर व्हीटग्रासच्या वापरातून एखादे औषध तयार झालेच तर ती एक क्रांतीच ठरेल.

(वाचा :- Yoga for Thyroid : घशाचा आजार थायरॉईडला मुळापासून नष्ट करतात हे 4 उपाय, एक्सपर्ट्सनी सांगितलेली पद्धत करा फॉलो)

व्हीटग्रास कसे नष्ट करतो कॅन्सर पेशी?

शास्त्रज्ञांना आढळले आहे की व्हीटग्रासमध्ये हिमोग्लोबिनच्या समान तत्व असतात जे की एक प्रोटीन आहे. हे ऑक्सिजन रक्तात पोहोचवण्याचे काम करते. अशावेळी व्हीटग्रासचे सेवन रक्तामधील ऑक्सिजनची मात्रा वाढवते. कारण ऑक्सिजन जर कमी प्रमाणात असेल तर त्यात कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढतात. असे वातावरण त्यांना पूरक असते. म्हणून व्हीटग्रास कॅन्सर सेल्सच्या विकासाला रोखू शकते. म्हणूनच व्हीटग्रासला एक मोठे महत्त्व सुद्धा प्राप्त झाले आहे.

हेही वाचा :  औषधात ब्लेडचे तुकडे टाकून पत्नीला पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

(वाचा :- Ex-AIIMSचे डायरेक्टर म्हणतात Omicron BF.7 ला ही एकच गोष्ट देऊ शकते मात, हातचं काम सोडा व 2 मिनिटे करा ही गोष्ट)

ही पोषक तत्वे असतात

व्हीटग्रासमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असण्यासोबतच अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यात मुख्यत: ग्लूटेथिओन, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फाइटोन्यूट्रिएंट्स, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि बी कॉम्प्लेक्स, क्लोरोफिल तसेच प्रोटीनचा समावेश असतो. तर याच कारणांमुळे वैद्यकीय क्षेत्रात व्हीटग्रासला एक मोठे महत्त्व आहे आणि कॅन्सर शिवाय सुद्धा अन्य अनेक आजारांवर व्हीटग्रास रामबाण मानले जाते.

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाल्यावर तुमच्याही मानेमध्ये दिसणार हे बदल, या एका भयंकर लक्षणावर ठेवा बारीक नजर)

कसे करावे सेवन?

आता तुम्हाला व्हीटग्रासचे महत्त्व तर कळले पण आता तुमच्या सुद्धा मनात हा प्रश्न आलाच असेल की व्हीटग्रासचे सेवन कसे करावे? तर व्हीट ग्रास हे ग्व्ह्याचे दाणेच असतात. जाणकार सांगतात की याचा वापर खासकरून शेतकरी प्राण्यांच्या आहारासाठी करतात. पण सध्या याचे फायदे समोर आल्याने एक सुपरफूड म्हणून सुद्धा व्हीटग्रासकडे पाहिले जाते. हे कच्चे खाऊ शकतो किंवा बाजारात याच्या कॅप्सूल्स मिळतात. पण याचा वापर सामन्यत: पावडर वा स्मुदी तसेच ज्यूससारख्या द्रव्यांमध्ये मिक्स करून केला जातो.

हेही वाचा :  40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी व जावेद अख्तर कधीच नाही भांडले, या जादुई ट्रिकची सर्व कमाल

(वाचा :- Protein Deficiency : करोना परत आलाय.! अशा गंभीर दिवसांत ही 7 लक्षणं दिसल्यास करू नका अजिबात दुर्लक्ष नाहीतर..!)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …