नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, फक्त कोरोनाच नाही तर संक्रमणही थांबणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. जागतिक पातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशावेळी लसीकरण होऊनही कोरोनाची बाधा होत आहे. असं असताना भारत सरकारने नेझल लसीकरणाला परवानगी दिली आहे. जगभरात १०० हून अधिक फार्मा कंपनी नेझल लसी संदर्भात अभ्यास करत आहेत.

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असताना भारताने त्या अगोदरच अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारीच केंद्र सरकारने कोरोना संदर्भात कडक नियम जाहीर केले. असं असताना गुरूवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नेझल व्हॅक्सीन संदर्भात माहिती दिली.

मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आज तज्ञांच्या समितीनेही नाकातील लसीला मंजुरी दिली आहे, याचा अर्थ येत्या काही दिवसांत कोणत्याही व्यक्तीला इंजेक्शनची गरज भासणार नाही आणि फक्त नाकात थेंब टाकल्यास त्याचा फायदा होईल.

​इंट्रानेजल कोविड व्हॅक्सीन

२८ नोव्हेंबर रोजी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने घोषणा केली की, इनकोवॅक (iNCOVACC BBV154) नाकाने दिले जाणारे जगातील पहिले कोविड व्हॅक्सीन आहे. याला इंट्रानेजल कोविड व्हॅक्सीन (Intra-Nasal Covid Vaccine) असे म्हटले जाते.

हेही वाचा :  लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन...

​नेझल व्हॅक्सीनचे फायदे

नाकातील लस ही इंजेक्शनपेक्षा अधिक फायदेशीर आहे. इंजेक्शनच्या तुलनेत याचे बरेच फायदे आहेत. साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती सुलभ असे नेझल व्हॅक्सीनचे फायदे आहेत. नाकातील लस ही विषाणूच्या प्रवेशावरच म्हणजे नाक किंवा वरच्या श्वसनमार्गावर संरक्षण प्रदान करतात.

काय म्हणाले आरोग्यमंत्री

​आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकांना लसीकरण करून घेण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यासह कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्यास सांगितले असल्याने लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे.

​पहिल्या इंट्रा-नासा लसला मंजुरी

1 डिसेंबर रोजी, भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड शॉपिंगमोड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने 18 आणि त्याहून अधिक वयोगटातील आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी भारताने विकसित केलेल्या COVID साठी जगातील पहिल्या इंट्रा-नासा लस मंजूर केली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …