ब्रेकअपमधून सावरण्यासाठी, नविन वर्षात नव्याने जगण्यासाठी या गोष्टींचा अवलंब कराच आयुष्यात होईल नवी पहाट

सध्याची पिढी ही मनाने खूप हळवी असलेली पाहयला मिळाली आहे. सध्या टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली आहे. तिचा ब्रेकअप झाला होता म्हणून तिने आत्महत्या केली अशी चर्चा पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या स्वभावातील या ८ गोष्टी तुमचे नाते खराब करु शकतात. तुमच्या याच अपेक्षा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकत नाही. चला तर मग या सरत्या वर्षात थोडासा बदल करुन आयुष्याला एक नवीन दिशा देऊया. (फोटो सौजन्य : istock)

​तुमचा जोडीदार तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल

या जगात कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नेहमी आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवाल अशी अपेक्षा करु नका याउलट स्वत:वर लक्ष केंद्रित करा यामुळे तुम्ही आनंदी राहाल. जो पर्यंत तुम्ही स्वत:वर प्रेम करत नाही तो पर्यंत तुम्ही आयुष्यात कोणालाही आनंदी ठेवू शकत नाही.

हेही वाचा :  बोगस शिक्षकांनंतर आता शिक्षकांचा 'बदली' घोटाळा

​तुमचा जोडीदार तुमच्यावर कधीही रागावणार नाही

एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं ही वाईट गोष्ट आहे. कारण तो व्यक्ती आपल्याला हवं तसा वागला नाही तर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर कधीही रागावणार नाही असे होणार नाही. त्यामुळे आयुष्यात जर तुमच्यात नकारात्मक प्रसंग उद्भवतील तेव्हा तुम्ही त्यांना कसे सामोरे जाता हे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत रागाच्या भरात काही बोलणे टाळा आणि तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा.

​जोडीदार तुमच्याशी नेहमी सहमत असेल

हेल्दी नात्यात तुमच्या जोडीदाराशी कधी कधी मतभेद असणे चांगले असते. यामुळे हे सिद्ध होते की तुम्ही दोघेही स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्यास सक्षम आहात. तुमचे मत ठामपणे जोडीदारासमोर मांडा. (वाचा :- महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रता शिरोडकरने या कारणासाठी सोडला अभिनय, 17 वर्षांनंतर रहस्यावरुन उघडला पडदा)

​तुमचा जोडीदार कधीही बदलणार नाही

वेळेनुसार लोक बदलतात हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तुमचा जोडीदार बदलणार नाही अशी अपेक्षा करु नका. त्याऐवजी, लोक बदलतात ही वस्तुस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करा. (वाचा :- त्या दिवशी नात्यासाठी सुधा मूर्तींनी ‘ते’ खास काम केलं नसते तर, आज इन्फोसिससारखं साम्राज्य उभंच राहिलं नसतं )

हेही वाचा :  Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा; 'या' अभिनेत्रीचा दावा

​तुमचे नाते नेहमीच परिपूर्ण असेल

कोणतेही नाते परिपूर्ण नसते. नेहमीच चढ-उतार असतील. त्यामुळे चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टीकडे लक्ष न देता. वास्तवात जायला शिका. (वाचा :- सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी वाचून डोळे पाणवतील )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …