ख्रिसमसला द्या गर्लफ्रेंडला स्वस्त आणि मस्त गिफ्ट, नातं करा अधिक घट्ट

ख्रिसमसच्या सणाला गिफ्ट मिळणं कोणाला नाही आवडत. अर्थात प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट्सची मनातून अपेक्षा असतेच. विशेषतः वेगळं नातं असतं ते बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडचं. या ख्रिसमसला आठवडाभर आपल्याला काय मिळणार याची गर्लफ्रेंड नक्कीच वाट पाहत असते. मग आपलं नातं खास करण्यासाठी बॉयफ्रेंडलाही प्रश्न निर्माण होतो की आठवडाभर नक्की काय गिफ्ट्स द्यायचे. बरं ते गिफ्ट्स खिशाला परडणारेही असायला हवेत. नातं तर जपायला हवं आणि गर्लफ्रेंडच्या अपेक्षाही. मग अशावेळी १०० रूपये आणि त्यापेक्षाही खाली अशी काही गिफ्ट्स जी तुम्ही गर्लफ्रेंडला किमान ५ दिवस सलग नक्कीच देऊ शकता. अशाच काही खास आयडियाज.

होममेड चॉकलेट बॉक्स

आपल्या गर्लफ्रेंडला आनंदी करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनवून खास गिफ्ट रॅप करून आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट करू शकता. अनेक मुलींना चॉकलेट अधिक आवडते. तसंच घरात बरेचदा केकचे सामानही असते. त्यात आपल्या बहिणीची वा आईची मदत घेऊन बाजारातून सामान आणून तुम्ही तुमच्या हाताने ही चॉकलेट्स तयार करून घ्यावी आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून द्यावी. तुम्ही तिच्यासाठी हे खास सरप्राईज केले आहे याचा तिला होणारा आनंद हा नक्कीच वेगळा असेल. तसंच तुमच्या खिशालाही कात्री लागणार नाही.

हेही वाचा :  Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

कस्टमाईज किचैन

अनेकांना आपल्या नावाची किचैन आवडते. बाजारात १०० रूपयांच्या आत वूडन अथवा कार अशा विविध पद्धतीच्या डिझाईन्समध्ये किचैन तयार करून मिळते. दादर, कुलाबा, भुलेश्वर अशा ठिकाणी अगदी तुमच्या नावाच्या तयार किचैनही उपलब्ध असतात. तुम्हाला फक्त तिथे जाऊन ती निवडून घेऊन यायची आहे. तर ही किचैन बघून नक्कीच तुमची गर्लफ्रेंड खूष होईल यात शंका नाही. त्यातही तुमची गर्लफ्रेंड मराठी असेल तर तिच्या मराठी नावाची किचैन ही अधिक आनंद देणारी ठरेल.

(वाचा – क्षिती-हेमंतच्या लग्नाला झाली १० वर्ष, लग्नाचे नाते कसे राहते टिकून)

वाचाल तर वाचाल

आजकाल वाचन खूपच कमी झाले आहे. मात्र तुमच्या गर्लफ्रेंडने अधिक वाचावे असे तुम्हाला वाटत असेल आणि तिला आवडत असेल तर तुम्ही पुस्तकंही तिला ख्रिसमसला गिफ्ट देऊ शकता. कुलाबा, फोर्ट, फाऊंटन अशा ठिकाणी १०० रूपयांच्या आत अनेक चांगल्या लेखकांची आणि चांगल्या विषयांची पुस्तके तुम्हाला सापडतील. याचा फायदा असाही होईल की तिचे पुस्तक वाचून झाल्यावर तुम्हालाही आवड असेल तर तुम्ही अशी पुस्तके नंतर वाचू शकता. तसंच मोबाईल अथवा टीव्ही पाहात बसण्यापेक्षा वाचन हा कधीही उत्तम पर्याय ठरतो. याचा छंद कोणत्याही वयात तुम्ही स्वतःला लावलात तर तुम्ही समृद्धच व्हाल हे नक्की. त्यामुळे कोणत्याही गोष्टी गिफ्ट म्हणून देण्यापेक्षा ज्याचा उपयोग होईल अशी वस्तू तुम्ही देऊ शकता.

हेही वाचा :  प्राजक्ता माळीचा निळ्याशार ड्रेसमध्ये पारंपारिक लूक, चाहते म्हणतात ''निले निले अंबरपर चांद जब आए''

(वाचा – Love Story: जेव्हा मनावर आघात झालेल्या दिनेश कार्तिकला मिळालं दीपिकाच्या रूपात खरं प्रेम, साथ महत्त्वाची)

नोट्ससाठी ट्रेंडी डायरी

नोट्स काढायला अथवा ऑफिसमध्ये मीटिंग्जसाठी एखादी सुंदरशी डायरी जी तुमच्या गर्लफ्रेंडला उपयुक्त ठरेल अशी तुम्ही निवडू शकता. अशा अनेक ट्रेंडी डायरीज तुम्हाला गिफ्ट शॉपमध्ये अथवा स्टोअर्समध्ये १०० रूपयांपर्यंत उपलब्ध होतात. अधिक मोठी डायरी निवडण्यापेक्षा पॉकेट फ्रेंडली आणि तितकीच दिसायला सुंदर डिझाईन्सची तुम्ही निवडलीत तर तुमची गर्लफ्रेंड नक्कीच आनंदी होईल. अशा डायरीज तुम्हाला आणि तुमच्या गर्लफ्रेंडला आवडणार असतील तर तुम्ही अधिक प्रमाणातदेखील घेऊ शकता.

(वाचा – नात्यात भावनेवर नसेल राहात नियंत्रण, तर घ्या या सोप्या टिप्सचा आधार)

हँडमेड ग्रिटींग कार्ड्स

सध्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळही कमीच मिळतो. त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडसाठी वेळात वेळ काढून या ख्रिसमसला तिच्यासाठी खास ग्रिटींग्ज बनवा. त्यामध्ये तुमच्या भावना व्यक्त करा. त्यामुळे तिला तुमच्या मनातील प्रेम किती आहे याची जाणीव होईल. बाजारातून कोणतीही गोष्ट आणण्यापेक्षा अशा पद्धतीने व्यक्त केलेलं प्रेम आणि ग्रिटींग्ज हे नक्कीच नाताळसाठी खास गिफ्ट असेल. हे स्वस्त असलं तरीही या गिफ्टची किंमत कोणीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हा पर्याय निवडणं अधिक चांगलं ठरेल.

हेही वाचा :  अजय देवगणची मुलगी न्यासाचा अतरंगी लुक,गुलाबी गाल आणि कपड्यांमध्ये पाहून तुम्हीही म्हणाल बार्बी डॉल

गिफ्ट निवडण्यासाठी सोप्या टिप्स

  • जे गिफ्ट्स तुम्ही निवडणार आहात त्याची यादी तुम्ही आधीच काढून ठेवा
  • बजेटमध्ये गिफ्ट घेण्यासाठी तुम्ही हवं असेल तर आधीपासूनच पैसे जमा करून ठेवा
  • आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी स्वस्तात मस्त पर्याय निवडा आणि त्याचे कसे सरप्राईज द्यायचे हे आधीच ठरवा. म्हणजे किमतीपेक्षा तुमच्या भावनांकडे अधिक लक्ष जाईल
  • एखाद-दुसरे अधिक गिफ्ट खरेदी करून ठेवा
  • गर्लफ्रेंडची आवड-निवड लक्षात घेऊनच गिफ्टची खरेदी करा. मात्र तुम्हाला तिने काही गोष्टी कराव्या वाटत असतील तर तेदेखील तुम्ही निवडून तिला गिफ्ट करू शकता

स्वस्तात मस्त गिफ्ट्सचे पर्याय आम्ही तुम्हाला इथे सांगितले आहेत. अगदी १०० रूपयांच्या आत या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचा नाताळ खास होईलच. तुम्हाला हे पर्याय कसे वाटत आहेत आम्हाला नक्की सांगा.

(फोटो क्रेडिटः Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …