Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; ‘या’ दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

Maharashtra weather : पश्चिमी झंझावात आणि त्यामुळं झालेल्या परिणामांचे पडसाद देशभरातील हवामान बदलांमध्ये दिसून येत आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक राज्यातच सध्या हवामानाचं गणित बिनसल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीमध्ये मार्च महिन्यातील शेवटचा दिवस आणि एप्रिलची सुरुवात हवामानाच्या दृष्टीनं नेमकी कशी असेल याकडेच नागरिकांचं लक्ष आहे. (Maharashtra weather Mumbai Konkan and vidarbha will get rain showers latest Marathi news)

फेब्रुवारीत महाराष्ट्रातील बहुतांश भागाला अवकाळीनं झोडपलं. पुढील काही दिवसही हेच चित्र कायम असणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात मुंबईसह कोकण, विदर्भातील बुलढाणा- गोंदिया, वाशिम गडचिरोली भागात पावचाचा शिडकावा होईल. तर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर भागात ढगाळ वातावरणामुळं हवेत काहीसा गारवा जाणवेल. 

एप्रिल महिन्यात राज्यातील अवकाळीचं प्रमाण काही अंशी कमी होणार आहे. परिणामी पुढील आठवड्याची सुरुवात निरभ्र आभाळ आणि कोरड्या वातावरणानं होणार आहे. असं असलं तरीही देशाच्या दिशेनं वाहणारे वारे आणि त्यामुळं तयार होणारी परिस्थिती पाहता येत्या काळात पुन्हा एकदा काही भागांना अवकाळीचा तडाखा नाकारता येत नाही. 

हेही वाचा :  न्यायालयांच्या निकालांवर विधायक टीका व्हावी!; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन | Constructive criticism of court decisions Statement by Supreme Court Justice Abhay Oak akp 94

देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी… 

महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच काश्मीरचं खोरं, उत्तराखंडमधील केदारनाथ धाम, गंगोत्री, यमुनोत्री, मनाली, लडाख या भागांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 

 

एप्रिल महिन्यापासून वातावरणात होणारे हे बदल काहीसे मंद गतीनं होताना दिसतील. अनेक भागांमध्ये हवामान पूर्णपणे बदलेल. नव्यानं सक्रिय असणारा पश्चिमी झंझावात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढता पाय घेण्याची चिन्हं असल्यामुळं वातावरणात काही सकारात्मक बदल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात येईल. 

तब्येत जपा…

हवामानात होणारे बदल पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. मुद्द्याची गोष्ट म्हणजे देशभरात सध्या कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केल्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …