प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा…

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी बाळाच्या नावाबाबत खुलासा केला आहे.

एका मीडिया इव्हेंटमध्ये मधु चोप्रा यांनी आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मीडियाशी बोलताना मधु चोप्रा म्हणाल्या की, ‘मी आजी झाल्यावर खूप आनंदी झाले आहे. मी सतत हसत राहते. मी खूप आनंदी आहे.’

बाळाचे नाव काय?

यावेळी प्रियांका आणि निक जोनास यांच्या मुलाच्या नावाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप मुलाचे नाव ठेवलेले नाही. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ‘अजून नाव ठेवलेले नाही. पंडित नाव सुचवेल, तेव्हा बारसं होईल.’

सरोगेसीद्वारे बाळाचे स्वागत!

प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले की, ‘आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत, हे कळवताना खूप आनंद होत आहे. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो. कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!’

हेही वाचा :  समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …