समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

Raghuveer: आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक थोर संतांपैकी एक संत म्हणजे “समर्थ रामदास स्वामी”. समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट “रघुवीर” (Raghuveer) हा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी रामदास स्वामींचे जीवनचरीत्र चित्रपट रूपात जगासमोर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम गायकवाड हे ‘रघुवीर’ या चित्रपटामध्ये समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहेत. 

‘रघुवीर’ चित्रपटाची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्सनं यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक आणि अरविंद सिंह राजपूत या चित्रपटाचे निर्माते असून, वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॅा. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि.कडे वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी केलंय. अनेक मराठी लघुपट, वेबसिरीजचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड सध्या ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत महत्त्वाचं पात्र साकारत आहेत. याखेरीज ‘उंच माझा झोका’, ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘सत्यवान सावित्री’ या मालिकाही त्यांनी केल्या आहेत. ‘समांतर’ या बहुचर्चित वेब सीरिजसोबतच सध्या लाइमलाईटमध्ये असलेल्या ‘अथांग’मध्येही त्यांनी उत्तम भूमिका केल्यात. याशिवाय ‘बंदिशाळा’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांमध्ये विक्रम यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांचा रामदास स्वामींच्या रूपातील लूक रिव्हील करत ‘रघुवीर’ चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरवरील विक्रमचा लुक लक्ष वेधून घेणारा असून, ‘रघुवीर’बाबतची उत्सुकता वाढवणारा आहे.


संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेते अभिराम भडकमकर यांच्यासोबत निलेश कुंजीर यांनी पटकथा लेखन केले आहे तर अभिराम भडकमकर यांनी ‘रघुवीर’चे संवादलेखन केलं आहे. धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी संकलन केलं आहे. सचिन सुहास भावे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, नवीन प्रभाकर, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :  सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येणार

महत्त्वाच्या बातम्या:

Sarla Ek Koti : अभिमानास्पद! ‘सरला एक कोटी’ सिनेमाची प्रेक्षकावर भुरळ; भारावला अन् लेकीचं नाव ठेवलं…Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …