Rapunzel syndrome: वसईच्या १३ वर्षांच्या मुलीच्या पोटात आढळला १.२ किलो केसांचा पुंजका, यामागे विचित्र आजार कारणीभूत

मुंबईतील एका लहान मुलीच्या पोटात १.२ किलो वजन केसांचा पुजंका आढळला आहे. यानंतर एका विशिष्ट आणि दुर्मिळ अशा आजाराची माहिती शोधत आहेत. या आजाराचं म्हणजे सिंड्रोमचं नाव आहे रॅपन्जेल सिंड्रोम (Rapunzel Syndrome). हा आजार दुर्मिळ असण्यासोबतच अतिशय विचित्र देखील आहे. या आजाराने पीडित असलेली व्यक्ती डोक्याचे केस ओढते आणि महत्वाचं म्हणजे ते केस खाते देखील.

ही मुलगी 13 वर्षांची असून तिला पोटात दुखू लागल्याने मुंबईतील वसई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी सागितले की, मुलीला पोटात तीव्र वेदना, उलट्या, अपचन आणि ऍसिडिटीच्या तक्रारी होत्या. तिच्या पालकांनी तिला एका खाजगी दवाखान्यात नेले जिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. पण तिच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा होत नव्हती. जेवल्यानंतर काही मिनिटांतच तिला उलटी व्हायची. आम्ही सोनोग्राफी केली ज्यामध्ये आतड्यांमध्ये केसांचा तुकडा असे काहीतरी दिसून आले. जे केवळ शस्त्रक्रियेने काढले जाऊ शकते. आम्ही शस्त्रक्रिया सुरू केली ज्यामध्ये आतड्यातून 32 इंच केसांचा पुंजका काढण्यात आला, अस डॉक्टर सांगतात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  Fact Check: कांद्याच्या रसाने टक्कल पडणे होते दूर? काय आहे सत्यता जाणून घ्या

काय आहे Rapunzel syndrome

-rapunzel-syndrome

Webmd नुसार, सिंड्रोमबाबत पहिल्यांदा 1968 मध्ये माहिती मिळाली. हे नाव रॅपन्झेल या परीकथेच्या पात्राच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ही परीकथेतील राणी आपल्या लांब केसांसाठी ओळखला जात असे. या सिंड्रोममध्ये रुग्णाच्या पोटात केसांचा पुंजका आढळतो. कारण रुग्ण त्याच्या डोक्याचे केस खातो. सुरुवातीच्या टप्प्यावर या रोगाचे निदान करणे फार कठीण आहे कारण त्याची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात.

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​या आजाराचे रूग्ण होतात रॅपन्जेंल सिंड्रोमचे शिकार

ही स्थिती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये, हे लहान मुले, किशोरवयीन मुली आणि 30 वर्षांखालील तरुणींमध्ये दिसून येते. हा सिंड्रोम मुख्यतः अशा लोकांमध्ये होतो ज्यांना मानसिक विकारांचा इतिहास आहे. यामध्ये केस ओढणे, चघळणे, नखे चावण्याच्या सवयींचा समावेश आहे. या सिंड्रोमला ट्रायकोटिलोमॅनिया देखील म्हणतात.

(वाचा – Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला))

​या आजाराचे रूग्ण होतात रॅपन्जेंल सि़ंड्रोमचे शिकार

ही स्थिती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. 10 पैकी 8 प्रकरणांमध्ये, हे लहान मुले, किशोरवयीन मुली आणि 30 वर्षांखालील तरुणींमध्ये दिसून येते. हा सिंड्रोम मुख्यतः अशा लोकांमध्ये होतो ज्यांना मानसिक विकारांचा इतिहास आहे. यामध्ये केस ओढणे, चघळणे, नखे चावण्याच्या सवयींचा समावेश आहे. या सिंड्रोमला ट्रायकोटिलोमॅनिया देखील म्हणतात.

हेही वाचा :  नात्यातील नैराश्य घालवण्यासाठी 5-5-5 चा नियम करेल मदत, फक्त हे सोप काम करा

(वाचा – मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू)

​Rapunzel syndrome ची लक्षणे

rapunzel-syndrome-

Rapunzel syndrome ची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु ओटीपोटात जास्त प्रमाणात केस जमा झाल्यामुळे ही लक्षणे दिसू लागतात.

  • पोटदुखी
  • सूज
  • पोट भरल्यासारखे वाटणे
  • वजन कमी होणे
  • मळमळ
  • कमी वजनाची आणि वजन वाढण्याची भीती (एनोरेक्सिया नर्वोसा)
  • जेवणानंतर उलट्या होणे
  • बरगड्यांच्या खाली वेदना किंवा अस्वस्थता
  • केस गळणे
  • दुर्गंधी (हॅलिटोसिस)

(वाचा – Weight Loss Drink : हे १०० मिली ड्रिंक पोटावरची चरबी वितळवून टाकेल, मायग्रेन, डायबिटिजसह ६ आजारांवर रामबाण)

​कशामुळे होतो हा दुर्मिळ आजार

रॅपन्झेल सिंड्रोम बहुतेकदा ट्रायकोटिलोमॅनियाशी संबंधित असतो. ज्याला डोक्याचे केस तोडण्याची तीव्र इच्छा म्हणून ओळखले जाते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पोटात केस तुटतात आणि ते पचायला जड जातात आणि तुमच्या पोटाच्या पोकळीत अडकतात. जास्त वेळ केस खाण्याच्या सवयीमुळे पोटात केसांचा मोठा पुंजका बनतो.

(वाचा – शरीरात घाणेरडं कोलेस्ट्रॉलही हवंच, यामुळे स्ट्रोकचा धोका टळणार, या ५ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष)

​रॅपन्जेंल सिंड्रोम असलेल्या व्यक्तीला होतो मेंटल आजार

रॅपन्झेल सिंड्रोम असल्‍याने तुम्‍हाला एकाच वेळी इतर मानसिक स्‍वास्‍थ्‍य स्थिती असण्‍याची अधिक शक्यता असते. यामध्ये न खाल्लेल्या गोष्टी गिळण्याची इच्छा, स्किझोफ्रेनिया, पीटीएसडी, एडीएचडी, नैराश्य, एनोरेक्सिया नर्वोसा, ओसीडी यासारखे मानसिक विकार यांचा समावेश होतो. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की हा सिंड्रोम अशा लोकांमध्ये अधिक सामान्य आहे ज्यांना बालपणातील अत्याचार किंवा दुर्लक्षाचा अनुभव आला आहे.

हेही वाचा :  शरीर पोखरून टाकतोय Corona व थंडीचा प्रकोप, वाचण्यासाठी या 5 पद्धतींनी वाढवा इम्युनिटी

(वाचा – Weight Loss Story : 90 किलोच्या Nutritionist चा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 6 महिन्यात 30 किलो वजन कमी))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …