नैराश्यामुळेच येत आहेत का आत्महत्येचे विचार, नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपाय

सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन, प्रत्युषा बॅनर्जी आणि आता तुनिषा शर्मा यांच्या आत्महत्येमागे नैराश्य अर्थात Depression हे एकच कारण सांगण्यात येत आहे. नैराश्य आल्यामुळे या सेलिब्रिटींनी केलेल्या आत्महत्या सर्वांसमोर येत आहेत. पण असे अनेक लोक आहेत जे नैराश्याच्या गर्तेत येऊन आत्महत्या करतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. पण नेमकं नैराश्य म्हणजे काय आणि याची लक्षणे काय आहेत? या आत्महत्या रोखता येऊ शकतात का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. त्यामुळे याबाबत काही महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नैराश्य अर्थात Depression म्हणजे नेमकं काय?

-depression-

डिप्रेशन ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला अस्वस्थ करते आणि कोणत्याही कामातील तुमचे स्वारस्य काढून घेते. ही अशी स्थिती आहे जी तुम्हाला आत्महत्येच्या शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाते. आपल्यासह काहीच ठीक होत नाही आणि आपण काहीच करू शकत नाही अथवा आपल्याबरोबर काहीच ठीक होत नाही, आपल्याला आता काहीच मिळणार नाही अशा सतत विचारांनी मन ग्रासले जाते. रोजच्या आयुष्यात एकावर एक येणारे दुःख सहन न करता येणे आणि सतत घडणाऱ्या घटनांमुळे नैराश्य येण्याची क्रिया होत राहते. प्रेमात धोका मिळणे, नोकरी गमावणे, एखादी जवळची व्यक्ती गमावणे अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येऊ शखते. वेदनेच्या भावना सतत येत राहिल्या तर हे मेजर डिप्रेशनचे कारण ठरते. साधारणतः २ आठवडे हे नैराश्य टिकते आणि याच दरम्यान नैराश्य आलेल्या व्यक्तींना सांभाळावे लागते अन्यथा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल अशा व्यक्ती उचलतात.

हेही वाचा :  'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..'

काय आहेत नैराश्याचे प्रकार

नैराश्याचेही वर्गीकरण करण्यात आले आहे. काही व्यक्तींना सौम्य नैराश्य असते तर तर काही व्यक्तींना अतिशय त्रासदायक असे नैराश्य जाणवते. नक्की कोणते प्रकार आहेत जाणून घ्या.

मेजर डिप्रेशन डिसऑर्डर

नैराश्याच्या सर्वात गंभीर प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे. सतत दुःखी राहणे, निराशा येणं आणि आपण निरूपयोगी आहोत ही भावना सतत मनात बाळगणं. मनातून कधीही वाईट विचार निघून जात नाहीत आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारे विचार सतत मनात घोळत राहतात.

पर्सिस्टंट डिप्रेससी डिसऑर्डर

सतत नकारात्मक विचार आणि त्रास यामुळे साधारण २ वर्षे यातील लक्षणे दिसून येतात. सतत डिप्रेशन येणे आणि त्रास होणे याला डिस्टिमिया असेही म्हटले जाते.

मॅनिक डिप्रेशन अथवा बायपोलर डिसऑर्डर

हायपोमेनिया आणि अति मूड बदलणे या पद्धतीचे हे डिप्रेशन असते. हे नैराश्य असणाऱ्या व्यक्तींचे मूड हे सतत मिनिटामिनिटाला बदलत असतात. या व्यक्ती दिवसरात्र काही ना काही करत असतात पण त्यांना अजिबातच थकवा येत नाही. त्यांना नैराश्याने ग्रासले आहे हे स्वतःलाही माहीत नसते.

नैराश्याची नेमकी कारणे काय आहेत?

बऱ्याच व्यक्तींना आपण नैराश्यामुळे असे वागत आहोत याची कल्पनाही नसते. साधारणतः ३० टक्के लोकांना अंशिक स्वरूपात डिप्रेशनची समस्या असते. याची नेमकी कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊया –

  • आत्मविश्वासाची कमतरता अथवा स्वतःला कमी लेखणे
  • मानसिक अस्वास्थतेची अनुवंशिकता अथवा इतिहास असणे
  • काही औषधांच्या सेवनामुळे त्रास
  • तणावपूर्ण घटना आयुष्यात घडल्यामुळे
  • आयुष्यातून महत्त्वाच्या व्यक्तीला गमावल्यामुळे
  • आर्थिक समस्यांमुळे
  • घटस्फोट झाल्यामुळे
  • बाळ गमावल्यामुळे

अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे नैराश्याच्या गर्तेत माणूस जातो. याशिवाय डिप्रेशनला कोण विकसित करते अथवा कोण नाही हे प्रत्येक माणसाच्या विचार करण्याच्या क्षमेतवर अवलंबून असते.

हेही वाचा :  नाणार ! तो प्रकल्प होऊच नये असे नाही - संजय राऊत

(वाचा – अंथरूणातून उठल्या उठल्या येते चक्कर? समजून जा तुम्हाला झालेत कधीच बरे न होणारे हे भयंकर आजार, व्हा सावध नाहीतर)

डिप्रेशनची लक्षणे

नैराश्य हे तुम्हाला सतत औदासिन्यता आणत असते. ही स्थिती अनेक काळापासून असेल तर त्याला नैराश्य असे म्हणतात. यामध्ये अनेक लक्षणे वेगवेगळ्या परिस्थितीत दिसून येतात. कधी ही लक्षणे असतात तर कधी नसतात. पुरूष, महिला आणि मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात.

मूडसंबंधित लक्षणे

  • राग
  • आक्रमकता
  • चिडचिडेपणा
  • चिंता
  • सतत बेचैनी

भावनिक नैराश्य

  • आपल्याकडे काहीच राहिले नाही ही भावना
  • उदास आणि दुःख
  • निराशा

वागणुकीतील नैराश्य

  • कोणत्याही कामात मन न रमणं
  • कितीही आवडतं काम असेल तरीही आनंद न मिळणं
  • पटकन थकवा येणं
  • सतत आत्महत्येचे विचार येणं
  • अति दारूचे सेवन आणि ड्रग्जचा वापर
  • वाईट कामांमध्ये मन रमणं आणि चुकीच्या कामांमध्ये रमणं

झोपेच्या बाबतीतील नैराश्य

  • अनिद्रा/इन्सोम्निया
  • कमी झोप येणे
  • अति झोप येणे
  • संपूर्ण रात्र झोपच न येणे
  • डोकेदुखी
  • पचनसमस्या

(वाचा – Weight Loss: अतिरिक्त चरबी काढण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीमध्ये मिक्स करा या गोष्टी)

नैराश्यावरील उपचार

नैराश्यासह जगणे अत्यंत कठीण आहे. पण यावरील उपचार घेऊन तुम्ही तुमचे जीवन अधिक चांगले करू शकता. त्यासाठी तुम्ही सायकोलॉजिस्ट अथवा सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. काय आहेत उपाय –

औषधे

डिप्रेशनच्या उपायासाठी डॉक्टर अधिकाधिक अँटीडिप्रेसेंट्स, Anxiety अथवा अँटीसायकोटिक औषधांच्या सेवनाचा सल्ला देतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे योग्य नाही आणि याचा ओव्हरडोसही घेऊ नये.

सायकोथेरपी

आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकण्यासाठी तुम्ही सायकोथेरपी घेऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रपरिवाराच्या मदतीचा हातही घेऊ शकता. तुमच्या मनातील विचार मांडून त्यातून काय मार्ग काढायचा हे ठरवणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा :  FriendZone करणाऱ्या मैत्रिणीविरोधात 24 कोटींचा खटला, तरुणाची कोर्टात धाव

व्यायाम

आठवड्यातून ३ ते ५ दिवस ३० मिनिट्स व्यायाम करणे आवश्यक आहे. तसंच योगधारणा केल्यास तुम्हाला त्याचाही फायदा मिळतो. तुमच्या हार्मोन्सना जपण्यासाठी अर्थात तुमचा मूड चांगला राखण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लवकरात लवकर नैराश्यातून बाहेर निघू शकता.

अल्कोहोल घेणे टाळा

दारू पिणे अथवा ड्रग्जचे सेवन करणे हे काही वेळासाठी चांगले वाटू शकते. पण जास्त काळ याचा वापर झाल्यास तुमच्या मनावर आणि शरीरावर त्याचा वाईट परिणामच होतो. त्यामुळे नैराश्यात असाल तर दारू अथवा ड्रग्जचे सेवन टाळा.

आपली काळजी घ्यावी

रोज व्यवस्थित ८ तास झोप घ्यावी. हेल्दी डाएट खावे. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे आणि आनंद होईल अशा गोष्टी अधिकाधिक प्रमाणात कराव्या. जेणेकरून नैराश्यातून दूर होण्यास मदत मिळते.

नैराश्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला जर आपण डिप्रेशन मध्ये आहोत हेच कळत नसेल तर मात्र वेळीच स्वतःकडे लक्ष द्या. लक्षणे तपासून पाहा. डॉक्टरांशी बोलून व्यवस्थित सल्ला घ्या आणि आनंदी राहा!

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …