वेळीच ओळखा लहान मुलांमधील जंत संसर्ग, लवकर निदान होणे गरजेचे

जंत संसर्गासारखी समस्या ही केवळ मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्येही आढळून येते. जंत एक परजीवी म्हणून ओळखले जातात जे आतड्यांच्या भिंतींना चिकटून राहतात. तुम्हाला माहीत आहे का? अनेक प्रकारचे जंत जसे की टेपवर्म्स, राऊंडवर्म्स, पिनवर्म्स आणि हुकवर्म्स शरीरात आढळतात. शिवाय जंत संसर्गामुळे इतर अनेक शारीरिक संक्रमणांना बळी पडण्याची शक्यता वाढते. याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. औषधे किंवा सिरप आपल्या मुलाला जंत घालवण्यास मदत करू शकतात. याकरिता लवकर निदान करणे आवश्यक आहे. डॉ. सुरेश बिराजदार, बालरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल खारघर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​जंत होण्याचे संभाव्य स्रोत कोणते?​

​जंत होण्याचे संभाव्य स्रोत कोणते?​

या संसर्गाचे संभाव्य स्त्रोत म्हणजे दूषित अन्न आणि पाणी तसेस योग्यरित्या न शिजविलेले मांस, अस्वच्छता असे आहेत. जंतांची उपस्थिती दर्शविणारी लक्षणे म्हणजे भूकन लागणे, वजन कमी होणे, पुरळ उठणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, वारंवार लघवी होणे आणि थकवा येणे अशी आहेत.

हेही वाचा :  मेळघाटात मांत्रिक करणार मातामृत्यू आणि बालमृत्यूचा दर कमी, आरोग्य विभागाचा अजब दावा

​आपल्या मुलाला कृमीदोष दूर करणे का आवश्यक आहे?​

​आपल्या मुलाला कृमीदोष दूर करणे का आवश्यक आहे?​

कृमीदोष दूर करण्यासाठी डीवर्मिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आतड्यांमधील जंतांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी औषधाचा वापर केला जातो. वर्म्स दूर करणे आणि रुग्णाला अस्वस्थता आणणारी कोणतीही संसर्ग काढून टाकणे हे या उपचाराचे उद्दीष्ट आहे. जर वर्म्स काढले नाहीत तर ते आतड्यात अंडी घालून गुणाकार करू शकतात आणि मुलाच्या वाढीस आणि विकासावर परिणाम करतात.

(वाचा – अॕडिनोव्हायरसचा त्रास मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका)

​करू शकता डिवर्मिंग​

​करू शकता डिवर्मिंग​

डिवर्मिंग केल्यामुळे आपल्या मुलास त्याचे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वर्म्समुळे होणा-या तीव्र आजारांपासून आवश्यक संरक्षण प्रदान करते. मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते कारण त्यांची एकाग्रता वाढू शकते तसेच त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यात अडथळे निर्माण होत नाहीत. डिवर्मिंग करणे हे आपल्या लहान मुलाचे पौष्टिक आहार वाढविण्यात आणि अशक्तपणा तसेच आंतड्यांसबंधित संक्रमण व्यवस्थापित करण्यास मदत करते.

(वाचा – डायबिटीस रुग्णांना इन्शुलिनची कधी गरज भासते? वयानुसार किती असावे इन्शुलिनचे प्रमाण)

हेही वाचा :  World Sleep Day: झोपताना वरून पडल्याचा होतोय का भास? हे आहे महत्त्वाचं कारण

​काय खबरदारी घ्याल​

​काय खबरदारी घ्याल​
  • वयाच्या दुस-या वर्षापासूनच मुलांमधील कृमीदोष दूर केले पाहिजे. वारंवार येणार्‍या जंताचा प्रादुर्भाव असणा मुलांना वारंवार या जंताचा नाश करावा लागतो
  • आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी डिवर्मिंग प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे
  • आपल्या मुलांना चांगल्या सवयींकरिता पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. असे न केल्यास मुलांमध्ये गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात
  • मुलांना बर्‍याचदा असह्य ओटीपोटातील वेदना, उलट्या आणि अतिसारासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो
  • पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यावर किंवा खेळाच्या मैदानावरुन आपल्या मुलांनी हात धुतले की नाही याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे
  • संसर्ग टाळण्यासाठी दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करू नकामुलांना फळ आणि भाज्या देण्यापूर्वी ते व्यवस्थित धुवून घ्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा आणि कच्चे मांस खाऊ नका

(वाचा – खराब कोलेस्ट्रॉलवर मात करण्यापासून ते हृदय मजबूत होण्यापर्यंत चॉकलेट्सचे आरोग्यदायी फायदे)

​खेळून आल्यावर मुलांनी काय करावे​

​खेळून आल्यावर मुलांनी काय करावे​

मुले दिवसभर घराबाहेर खेळत असतात. खेळताना मातीमुळे त्यांचे हात खराब होतात. यातून त्यांना जंतूसंपर्क होऊ शकतो. यासाठी खेळल्यानंतर विशेषत: जेवताना मुलांना कटाक्षाने हात धुण्याची सवय लावा, असे केल्याने तुमची मुले सतत आजारी पडणार नाहीत आणि इतर आरोग्य समस्यांप्रमाणे त्यांना जंताचा त्रासदेखील होणार नाही.

हेही वाचा :  महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहेत चयापचयचे विकार! रोखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …